आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राममंदिराबाबत भागवतांची इच्छा हा माेदींसाठी अादेश; पालन करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - ‘अयाेध्येत राममंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश अाणावा, अशी इच्छा सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त  केली अाहे.  आपल्या संस्कृतीप्रमाणे मोठ्यांची इच्छा ही लहानांसाठी आदेशच असतो. त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांची इच्छा ही मोदींसाठी आदेशच असल्याने त्यांनी त्याचे पालन करावे,’ असे आवाहन साध्वी ऋतंभरा यांनी रविवारी नागपुरातील हुंकार रॅलीतून केले.  


या सभेला सरसंघचालक मोहन भागवत, ज्याेतिषपीठाधीश्वर जगद््गुरू शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज, देवनाथ पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज, विहिंपचे केंद्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार यांची उपस्थिती होती.  


‘एससी/ एसटी अॅक्ट, शहाबानाे प्रकरण संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात केंद्र सरकारने अध्यादेश काढला, मग राम मंदिरासाठीही केंद्राने अध्यादेश काढून कायदा करावा,’ अशी एकमुखी मागणी या हुंकार सभेत करण्यात आली. देवनाथ पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज यांनी आक्रमक शैलीत भाषण करीत अयोध्येत भव्य राम मंदिर होईल हे ठणकावून सांगितले. मुसलमानांनी राम मंदिराला विरोध करू नये. नाहीतर त्यांना काबूल, कंदहारपर्यंत पळवून लावू असा दम त्यांनी दिला. 

 

सरकारला दोन्ही बाजूंनी फायदा : वासुदेवानंद
राम मंदिरासाठी कायदा केला तरी हे सरकार निवडून येईल आणि कायदा केल्यानंतर सरकार पडले तरी पुन्हा हेच सरकार सत्तेत येईल. त्यामुळे सरकारने संसदेत कायदा करावा. त्यांना दाेन्ही बाजूंनी फायदाच अाहे, असे आवाहन ज्याेतिषपीठाधीश्वर जगद््गुरू शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी केले. आक्रमकांच्या खुणा या देशातून पुसून टाकल्या पाहिजेत. आक्रमकांनी बदललेल्या प्रत्येक शहराला त्याचे प्राचीन नाव देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...