नांदूरमधमेश्वरमध्ये 240 हून / नांदूरमधमेश्वरमध्ये 240 हून जास्त प्रकारचे पक्षी; पक्षीमित्रांसह देशी- विदेशी पर्यटकांची गर्दी

प्रतिनिधी

Jan 03,2019 10:10:00 AM IST

नाशिकरोड- गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर असलेले नांदूरमधमेश्वर अभयारण्य हे १०० चौरस किलोमीटर असून थंडीच्या काळात सुमारे २४० हून अधिक प्रकारचे देशी-विदेशी पक्षी हजेरी लावतात. त्यामुळे हे अभयारण्य पक्षीप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक उत्कृष्ट पर्यटनस्थळ निर्माण झाले आहे. वन्यजीव विभागाच्या वतीनेही या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना जास्तीत जास्त पक्षी पाहता यावे यासाठी जागोजागी मनोरे लावण्यात आले आहे. ग्रामविकास समितीतर्फे येणाऱ्या पर्यटकांना गाइड आणि दुर्बीण दिली जाते. सध्या येथे विद्यार्थ्यांची सर्वाधिक गर्दी आहे.

महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळख असलेल्या नांदूरमधमेश्वर अभयारण्यामध्ये सध्या थंडीचा हंगाम हा पक्ष्यांसाठी महत्त्वपूूर्ण असल्याने या ठिकाणी विविध देशांमधून पक्ष्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे या परिसरातून आकाशामध्ये उडणारे पक्ष्यांचे थवे, एक रांग, माळ असे विविध प्रकार पाहण्यास मिळत आहे.

४० हजार पक्ष्यांचे आगमन
नांदुरमधमेश्वर अभयारण्यामध्ये शनिवारी पक्षीगणना करण्यात आली. यावेळी संपूर्ण पाणथळ परिसरात आणि झाडांवर सुमारे ४० हजार पक्षी असल्याचे स्थानिक विकास समितीच्या सभासदांनी सांगितले.

X
COMMENT