आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरखेड उत्खनन; आतापर्यंत 400 पुरातन वस्तू उजेडात, भोगावती नदीकाठी ११ जानेवारीपासून सुरू आहे मोहीम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्याापीठ पुरातत्त्व विभागाद्वारे मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील उत्खनन मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. ११ जानेवारीपासून नरखेड गावालगत असलेल्या भोगावती नदी काठावरील एका टेकडीवजा जागेवर हे उत्खनन मोहीम विभागप्रमुख डॉ. माया पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते मोहिमेचे उद््घाटन करण्यात आले. दरम्यान सातवाहन कालावधीतील सुसंगत अशा विविध वस्तू, मातीची भांडी, पेव , हस्तीदंती मणी, लाल - काळ्या मातीची भांड्याचे तुकडे आदी तब्बल ४०० पेक्षा जास्त वस्तू सापडल्याने ही मोहीम उत्कंठावर्धक ठरली. दरम्यान कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी मोहिमेच्या मध्यास पुन्हा एकदा भेट देऊन अधिक माहिती जाणून घेतली. 

डॉ. माया पाटील म्हणाल्या, उत्खनन मोहिमेद्वारे प्राचीन संस्कृतीचे बंध तपासता येतात. उत्खननाची शास्त्रीय पद्धत विद्यार्थी या मोहिमेत सहभागी होत आत्मसात करतात. सापडत असलेल्या विविधांगी वस्तूचे महत्त्व शोधत, त्याचा कालखंड शोधणे हे आव्हानात्मक असते. प्रत्येक वस्तू कोठे सापडली, त्याचे उत्खननाच्या नकाशावरील स्थान निश्चित करावे लागते. त्याचे छायाचित्रण तर होतेच, पण प्रत्येक वस्तूचे आकारमान, स्केच काढून त्याची सविस्तर माहिती संकलित केली जाते. प्रयोगशाळेत पाठविणारे वस्तू वेगळ्या संकलित होतात. 

 

ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे ठरणारे ताम्र युगातील नाणी या मोहिमेत तब्बल १० पेक्षा जास्त आढळली. सातवाहन कालावधीतील कालखंडावर प्रकाश टाकणाऱ्या या वस्तू असू शकतात. सविस्तर माहिती उत्खननानंतरचा शास्त्रीय अभ्यास, निष्कर्षातून स्पष्ट होत असली तरी प्राथमिक अंदाजातूनही मानवी संस्कृतीच्या पुरातत्वीय राहणीमानावर प्रकाश टाकता येतात. 

 

ब्रशच्या माध्यमातून उत्खनन 
उत्खननासाठी कुदळ, फावडे यांचा वापर मुळीच करता येत नाही. प्राचीन कालखंडातील मौल्यवान वस्तूंची हाताळणी अतिशय नाजूक पद्धतीनेच करावी लागते. त्यासाठी मातीचा कण आणि कण नजरेखालून घातले जाते. ब्रशने वस्तू भोवतालीच माती काढली जाते. अतिशय बारकाईने उत्खनन केल्यानंतरच पुरातत्वीय बंध असणारे वस्तू आढळू शकतात. 

बातम्या आणखी आहेत...