आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: 'डाॅन बाॅस्काे', 'किलबिल'जवळ अखेर फेरीवाल्यांना मज्जाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शाळांजवळ फेरीवाला क्षेत्र सुरू झाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धाेका निर्माण हाेऊ शकताे ही बाब 'दिव्य मराठी'ने डाॅन बाॅस्काे अाणि किलबिल शाळेजवळील गैरप्रकारांसह प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासनाने येथील फेरीवाल्यांना मज्जाव केला अाहे.

 

मात्र हे करतांना महापालिका प्रशासनाने सिल्व्हर अाेक शाळेजवळील जागा सुचविल्यामुळे प्रशासनाला नक्की साध्य काय करायचे अाहे, असा प्रश्न निर्माण हाेताे. काेणत्याही शाळेपासून १०० मीटरच्या अात फेरीवाले नसावे असा सर्वाेच्च अाणि उच्च न्यायालयाचा अादेश असतानाही प्रशासन अापले मनमानी काम पुढे दामटविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यावरुन स्पष्ट हाेते.

 

शाळेच्या अाणि वसतिगृहांच्या परिसरात गर्दी व गाेंगाट असू नये, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे परिसर माेकळे असावेत म्हणून सर्वाेच्च अाणि उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांना शाळा परिसरात मज्जाव केला अाहे. असे असतानाही पश्चिम विभागातील शाळांबाहेर फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यात अाले. शाळा सुटल्यानंतर म्हणजेच सायंकाळच्या सुमारास हे क्षेत्र सुरू हाेतील असा नियम महापालिकेने करून दिला असला तरीही अनेक ठिकाणी दुपारपासूनच खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या उभ्या केल्या जात अाहेत. सायंकाळच्या सुमारास मद्याच्या बाटल्या शाळेच्या गेटमध्ये मद्याच्या बाटल्या फेकल्याचे प्रकार डाॅन बाॅस्काे अाणि किलबील शाळेजवळ घडले हाेते. या परिसरात डाॅन बाॅस्काे, किलबिल शाळेसह मारिया विहार, दिव्य दान अाणि सेलेशियन ट्रेनिंग सेंटर अशा प्रतिष्ठित शाळा असून हजाराेंच्या संख्येने विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. तसेच जवळच गाेखले एज्युकेशन शैक्षणिक संस्थादेखील अाहे. मारिया विहार या शाळेतील व काॅलेजमधील मुलींचे वसतिगृह अाहे. त्यामुळे हा भाग शैक्षणिक, शांत व विद्यार्थ्यांच्या रहदारीचा अाहे. फेरीवाला क्षेत्रामुळे उरलेले पदार्थ रस्त्यावर टाकले जातात. त्यामुळे ते खाण्यासाठी कुत्रे जमा हाेतात. त्यांच्यापासून विद्यार्थ्यांना धाेका निर्माण हाेताे. मुळात या रस्त्यासाठी डाॅन बाॅस्काे संस्थेने जागा दिली असून त्यावेळी महापालिकेबराेबर झालेल्या करारात हा रस्ता केवळ वाहतुकीसाठीच वापरला जाईल असे म्हटले हाेते. परंतु फेरीवाला क्षेत्र जाहीर करुन पालिकेने या कराराचाच भंग केल्याचे स्पष्ट झाले हाेते. या सर्व बाबी 'दिव्य मराठी'ने वेळाेवेळी निदर्शनास अाणून दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने अाता संबंधित फेरीवाल्यांना या जागेत व्यवसाय करण्यास मज्जाव घातला अाहे. मात्र यासंदर्भात फेरीवाल्यांनी प्रशासनाकडे विचारणा केली असता चक्क सिल्व्हर अाेक शाळेबाहेरील जागेचा पर्याय प्रशासनाने ठेवला. त्यामुळे नियमभंग करण्याच्या मानसिकतेतून महापालिका बाहेर पडतच नसल्याचे स्पष्ट झाले अाहे.

 

परवानगी १० फेरीवाल्यांना प्रत्यक्षात २० पेक्षा अधिक
डाॅन बाॅस्काे शाळेजवळील फेरीवाला क्षेत्रात महापालिकेने दहा फेरीवाल्यांना परवानगी दिली हाेती. प्रत्यक्षात या ठिकाणी २० ते २२ फेरीवाल्यांनी ठाण मांडले हाेते. महापालिकेने संबंधित जागेवर येऊन तपासणी केली असता नाेंदणी केलेल्यांपेक्षा अधिक फेरीवाले अाढळून अाले.

 

बातम्या आणखी आहेत...