आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राच्या स्मार्ट सिटी याेजनेतून शहरातील 481 उद्यानांमध्ये साैरऊर्जेचा लखलखाट; वर्षाला 44 लाख 9 हजार रुपयांची बचत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पर्यावरणपूरक उत्तम पर्याय ठरलेल्या म्हणून साैर ऊर्जेतून शहरातील सर्व म्हणजे ४८१ उद्यानातील पथदीप लखाखणार अाहेत. यामुळे वर्षाला ९ लाख २१ हजार ६२५ युनिट, म्हणजेच ४४ लाख ९ हजार ८५ रुपये किंमतीच्या विजेची बचत हाेणार अाहे. 

 

केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने स्मार्ट सिटीच्या संकल्पनेत साैर ऊर्जेच्या प्रकल्पांना प्राेत्साहन देण्याचे धाेरण अवलंबिले अाहे. याअंतर्गत शहरातील सर्वच उद्यानांत साैर ऊर्जेचे पॅनल बसविण्यात येणार अाहेत. उद्यानांना सुरक्षा कुंपण असल्यामुळे साैर उपकरणांसाठी अावश्यक असलेल्या बॅटरीही सुरक्षित राहू शकतात. 


साैर पॅनलचा खर्च कमी करावा : १२ फ्लॅटच्या इमारतीसाठी साधारणत: २००० लिटर क्षमतेचे साैर पॅनल लावले जाते. त्याचा खर्च दाेन ते सव्वादाेन लाखांपर्यंत असताे. या उपकरणाला जाेडले जाणारे पाईप अाणि पॅनल लावणाऱ्या कामगारांचा खर्च बघता एक पॅनलसाठी सुमारे अडीच लाख सर्वसमावेशक खर्च येतो. पॅनल्सची किंमतच अधिक असल्याने ही यंत्रणा लावण्यास चटकन कुणी तयार होत नाही. त्यामुळे अागामी काळात साैरउर्जेची उपकरणे अल्प खर्चात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शहरातील कारभाऱ्यांवर अाहे. 

 

काय करणे गरजेचे 
हायमास्टलाही साेलर पॅनल : पथदीपांना मिळणारा प्रतिसाद बघता हायमास्टसाठीही सोलर पॅनल लावणे गरजेचे आहे. शहरात सध्या १५० हायमास्ट असून यासाठी वीज अधिक खर्च होत असल्यामुळे सोलर पॅनलचा पर्याय उत्तम ठरू शकतो. 

 

सर्व रुग्णालयात साेलर वाॅटर हिटर : पालिकेचे बिटको, डॉ. हुसेन, मोरवाडी आणि इंदिरा गांधी रुग्णालयात साेलर वाॅटर हिटरची व्यवस्था केली अाहे. 

 

-  ५ टक्के सवलत साेलर हिटर वापरणाऱ्यांना 
- ३० टक्के पथदीपांच्या बिलात बचत 
- ३७ सिग्नल्सना साैर ऊर्जा यंत्रणा 
- ४ रुग्णालयांना साेलर वाॅटर हिटर 
- ६५० विजेच्या दिव्यांना साेलर पॅनल 

 

असे अाहे बचतीचे समीकरण 
एका उद्यानात ७ पथदीप गृहीत धरल्यास शहरातील ४८१ उद्यानांमध्ये ३ हजार ३६७ पथदीप अाहेत. या उद्यानांत २५२५ किलाेवॅट विजेचा वापर दरराेज हाेताे. म्हणजेच १२ हजार २४७ इतके विजेचे बिल दरराेज येते. एका महिन्यात ३ लाख ६७ हजार रुपये अाणि वर्षात ४४ लाख ९ हजार रुपयांची बचत हाेईल, असा अंदाज अाहे. 


साेलर हिटर वापरावर ५ टक्के सवलत : नैसर्गिक स्त्राेताचा वापर वाढविण्यास प्राेत्साहन देण्यासाठी साेलर वाॅटर हिटरचा घरगुती वापर केल्यास महापालिका करात (सरकारी कर वगळता) १ एप्रिल २००६ पासून ५ टक्के सूट देत अाहे. 

 

सहा महिन्यात पालिकेच्या १६ इमारतींना साैर उपकरणे 
सहा विभागीय कार्यालयांसह महापालिकेच्या १६ इमारतींमध्ये साैर उपकरणे लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत अाहे. यासाठी प्रशासनाने कार्यादेश दिला असून सहा महिन्यात सर्व कार्यालये साैर ऊर्जेवर चालतील. दुसऱ्या टप्प्यात शहरातील सर्व उद्यानांना साैर पॅनल लावण्यात येतील. - तुकाराम मुंढे, अायुक्त, महापालिका 

 

महापालिका करते ३० टक्के वीजबचत 
शहरात सुमारे ८० हजार पथदीप असून, यापूर्वी त्याचे बिल सुमारे सव्वाकोटी रुपये महिना येत होते. काही वर्षांपूर्वी शहरात विजेची बचत करणारे नवीन प्रकारचे दिवे अाणि टी-५ फिटिंग लावण्यात आल्या. सुमारे ६५० ठिकाणी सोलर पॅनल्स लावण्यात आले. यापूर्वी एका पथदीपासाठी १५० युनिट विजेचा वापर होत असे. नवीन पद्धतीमुळे एका लाइटसाठी फक्त २४ युनिट वीज खर्च होते. महिन्याला सुमारे ३० टक्के विजेची बचत होत आहे. 

 

सर्वच सिग्नल्सना साैर यंत्रणा : लोडशेडिंगदरम्यान प्रमुख सिग्नल्सवरील वाहतुकीचा गाेंधळ दूर हाेण्यासाठी महापालिकेने शहरातील सर्व म्हणजे ३७ सिग्नल्सवर साेलर पॅनल लावले अाहेत. यातून ७० टक्के विजेची बचत हाेत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...