आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ मार्गावर एकेरी वाहतूक प्रयाेगाचा उडाला फज्जा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील अत्यंत वर्दळीचा व मध्यवर्ती भाग असलेल्या त्र्यंबकरोड ते अशोकस्तंभ हा मार्ग महापालिकेच्या वतीने स्मार्ट रोड म्हणून विकसित करण्यात येत आहे. या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रायोगिक तत्त्वावर सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत एकेरी वाहतुकीबाबतची अधिसूचना काढण्यात आली होती.प्रत्यक्षात मात्र मंगळवारी (दि. २३) वाहतूक पोलिसांकडून दुपारी १२.३० वाजता या अधिसूचनेप्रमाणे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला. विशेष म्हणजे निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे दुपारी ४ वाजताच पोलिसांनी पॅकअप केल्याने या प्रयोगाचा फज्जा उडाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली हेाती. 

 

देशातील १०० स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेल्या नाशिक शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्चून विविध उपक्रम, योजना राबविल्या जात आहे. या योजनेंतर्गत स्मार्ट रोड पायलट प्रोजेक्ट म्हणून त्र्यंबकरोड ते अशोकस्तंभ हा मार्ग विकसित करण्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून हाती घेण्यात आले आहे.

 

नाशिक ते ठाणे सायकल ट्रॅकची निर्मीती व्हावी : नाशिक शहरातील इंदिरानगर अंडरपासच्या गंभीर समस्येचा मुद्दाही फोरमने उपस्थित केलेला आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग शहरातील ३० मीटरच्या डीपी रोडला ओलांडतो तिथे कुठल्याही प्रकारचे दूरदृष्टीने नियोजन करण्यात आलेले नाही, अशी खंत फोरमने व्यक्त केली आहे. मुंबई आणि परिसरात साईभक्तांचे प्रमाण मोठे आहे. त्यापैकी अनेक जण शिर्डी येथे पायी दिंडीने जातात. यातील बहुतांश दिंड्या या नाशिक-मुंबई महामार्गावरूनच जातात त्यांचा अाणि नाशिक हे भारतातील एक प्रमुख 'सायकल डेस्टिनेशन'च्या रुपाने नावारुपास येऊ लागलेले असून येथील सायकलिस्टसची वाढणारी संख्या लक्षात घेऊन नाशिक ते ठाणेदरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात यावी. महामार्गावरील मार्गिकांच्या रुंदीची फेररचना करून आणि 'गार्ड स्टोन'चा वापर करून दिंडी मार्ग व सायकल ट्रॅक तयार करावा, अशीही मागणी फोरमने केलेली आहे. 


बॅरिकेड्स तोडत नेले वाहन : सीबीएस परिसरात अचानक प्लास्टिक बॅरिकेड्स लावत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला. याला काही वाहनधारकांनी विरोधात बॅरिकेड्स तोडत वाहने नेली. या प्रकारामुळे वाहनधारक आणि पोलिसांमध्ये वाद होत होतेे. 

 

रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे अडचण 
स्मार्ट रोडचे काम सुरू असल्याने निर्माण झालेली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एकेरी वाहतुकीचा प्रयोग राबविण्यात आला. रस्त्यावरील अतिक्रमण, प्रचंड गर्दी यामुळे काही अडचणी आल्या. बुधवारी (दि. २४) परिस्थितीनुसार एकेरी वाहतुकीबाबत निर्णय घेतला जाईल. - लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त 

 

ठेकेदाराच्या कामगारांवरच मदार 
स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराच्या कामगारावरच वाहतुकीचे नियोजन असल्याची परिस्थिती बघावायास मिळाली. प्रयोगाच्या दिवशीच अशी परिस्थिती असली तर नंतर काय परिस्थिती होईल, असाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. 

 

१० तासांचे नियोजन साडेतीन तासांत फसले 
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून त्र्यंबकनाका ते अशाेकस्तंभ या मार्गावर एकेरी वाहतुकीसाठी १० तासांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात नियोजन फसल्याने या प्रयोग अवघ्या ३.३० तासांत पॅकअप करण्यात आले. 

 

बातम्या आणखी आहेत...