आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सॅक्रेड गेम्स' वर चित्रपट आला असता तर फ्लॉप झाला असता - नवाजुद्दीन सिद्दीकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: वेब सिरीज 'सॅक्रेड गेम्स' मध्ये गणेश गायतोंडेची भूमिका करून नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लवकर तो या वेब सिरीजच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू करणार आहे. याविषयी नवाज सांगतो..., ' आम्ही लवकरच 'सॅक्रेड गेम्स'च्या तिसऱ्या भागाचे शूटिंग सुरू करणार आहाेत. लोकांना विश्वास वाटणार नाही, मात्र आंतराराष्ट्रीय पातळीवर मालिका लोकप्रिय झाली आहे. मी मागे रोममध्ये होतो तेव्हा याच्या पहिल्या भागाचे स्ट्रिमिंग सुरू झाले होते. तेव्हा तेथील लोकांनी याचे काैतुक केले होते. याचा दुसरा भाग बनवण्यात यावा अशी त्या लोकांनी इच्छा व्यक्त केली होती. भारतातही लोकांचे प्रेम मिळाले आहे.' 


या सिरीजच्या इम्पॅक्टविषयी नवाज म्हणाला..., 'नेटफ्लिक्स माध्यमातून आम्ही या सिरीजचे विश्लेषण केले. ग्रामीण प्रेक्षकांवर याचा चांगला प्रभाव पडला. ज्या प्रेक्षकांना वर्ल्ड सिनेमा आणि कंटेंटची जास्त माहिती नाही, त्यांना ती आवडली आहे. त्यामुळे लोकांची आवड आम्हाला कळली. त्यामुळे याच्या दुसऱ्या भागात आम्ही तसा बदल करणार आहोत. यात समाज, सिस्टिम व कुटुुंबांचा क्रूर चेहरादेखील पाहायला मिळेल. 


 नवाजुद्दीन हा पूर्ण महिना रजनीकांत स्टारर 'पेट्टा' च्या चित्रीकरणात व्यग्र राहणार आहे. यानंतर तो 'सेक्रेड गेम्स' सीझन 2 ची तयारी करणार आहे. 'पेट्टा' मध्ये नवाज खलनायकाची भूमिका करणार आहे. 

 

नवाजुद्दीन सिद्दिकी म्हणाला... 
वेब सिरीज 'सॅक्रेड गेम्स' मधून लोकप्रिय झालेला नवाजुद्दीन सिद्दिकी लवकरच याच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू करणार आहे... 


नवाज म्हणाला...
'डिजिटल प्लॅटफॉर्म फक्त प्रेक्षकांमुळे चालतो, असे मला वाटते. प्रेक्षकच तुम्हाला हिट करतात. यात कोणीच कथित सिने जाणकार नसतो. जर 'सॅक्रेड गेम्स' वर चित्रपट आला असता तर तो नक्कीच फ्लॉप झाला असता, असे मला वाटते. उदाहरण म्हणून 'रमन राघव 2.0' घ्या. या चित्रपटात क्राइम, पॅशन आणि जीवनाच्या क्रूर सत्याची कथा दाखवण्यात आली होती. मात्र या चित्रपटाला इतकी लोकप्रियता मिळाली नाही, जितकी 'सॅक्रेड गेम्स'या वेब सिरीजला मिळाली. 

बातम्या आणखी आहेत...