Home | TV Guide | News about Nilu vaghela, diya aur bati ham bhabo

नीलू वाघेला आता दिसणार नव्या भूमिकेत, म्हणाल्या - 'भाभो'च्या भूमिकेतून बाहेर पडणे सोपे नाही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 06, 2018, 12:00 AM IST

'दिया और बाती हम' मालिकेतील अभिनेत्री नीलू वाघेला सध्या आगामी मालिका 'मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो'च्या शूटिंगमध

  • News about Nilu vaghela, diya aur bati ham bhabo

    एन्टटेन्मेंट डेस्क: 'दिया और बाती हम' मालिकेतील अभिनेत्री नीलू वाघेला सध्या आगामी मालिका 'मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या मालिकेत ती वकिलाची भूमिका साकारत आहे. याविषयी नीलूने सांगितले..., 'भाभोच्या भूमिकेतून निघणे माझ्यासाठी सोपे नाही. मी सात वर्षे ही भूमिका जगली आहे. माझ्या आत ते पात्र आजही जिवंत आहे. भाभोच्या पात्राने मला पैसा आणि प्रसिद्धी तर दिलीच मात्र या पात्राने मला ओळखही दिली. नव्या मालिकेत मी वकील झाले आहे. भाभोपेक्षा ही भूमिका फारचं वेगळी आहे. वकिलाच्या भूमिकेसाठी मला वेळ लागेल. मात्र त्या भूमिकेला मी आजही मिस करते. नीलूने अनेक राजस्थानी चित्रपटात काम केल्यानंतर 'दिया और बाती हम' मालिकेत काम केले होते. ती रिअॅलिटी शो 'नच बलिए 5'मध्ये पती अरविंद कुमार सोबत दिसली होती.

Trending