आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वात जुन्या फुटबाॅल स्पर्धेची 33 वर्षांपूर्वी सुरुवात; भारत चाैथ्यांदा सहभागी; सर्वाधिक 100 काेटींची बक्षिसे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबुधाबी- जगातील सर्वात जुन्या आणि माेठ्या फुटबाॅल चॅम्पियनशिपला आज शनिवारपासून अबुधाबी येेथे सुरुवात हाेत आहे. एएफसी एशियन चषक फुटबाॅल स्पर्धा यंंदा यूएईमध्ये आयाेजित करण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटनाची किक आज अबुधाबीच्या मैदानावर बसणार आहे. या स्पर्धेत यजमान यूएई आणि बहरीन यांच्यात सलामी सामना हाेणार आहे. त्यापूर्वी स्थानिक ६०० कलाकार सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या नृत्याविष्काराने उद््घाटन साेहळ्याला रंगत आणणार आहेत. जगभरातील ३० काेटींपेक्षा अधिक चाहते हा उद््घाटनीय साेहळा पाहतील, असा दावा आयाेजकांनी केला. त्यासाठी भव्य आणि यशस्वी स्वरूपाचे आयोजन करण्यात आले. 

 

आशिया चॅम्पियन हाेण्यासाठी यंदा २४ संघ मैदानावर उतरणार आहेत. या सर्व संघांची सहा गटांत विभागणी करण्यात आली. यातील प्रत्येक गटात चार संघांचा समावेश असेल. ही स्पर्धा २८ दिवस रंगणार आहे. या २४ संघांमध्ये एकूण ५१ सामने हाेतील. या स्पर्धेच्या किताबासाठी १ फेब्रुवारी राेजी अंतिम सामना हाेईल. भारतीय फुटबाॅल संघ आठ वर्षांनंतर या स्पर्धेसाठी पात्र ठरला. भारताचा या स्पर्धेतील हा चाैथा सहभाग आहे. १९६४ मध्ये भारताच्या या स्पर्धेत अव्वल कामगिरीची नाेंद आहे. भारताचा पहिला सामना रविवारी थायलंडशी हाेईल. 

 

भारत सर्वात युवा तिसरा संघ 
यंदाच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाच्या वयाची सरासरी २५ वर्ष आहे. त्यामुळे भारत हा या स्पर्धेत सर्वात तिसरा युवा संघ मानला जाताे. यात व्हिएतनामचा संघ (२३ वर्ष) सर्वात युवा आहे. तर, त्यापाठाेपाठ दुसऱ्या स्थानी इराक (२४ वर्ष) संघ आहे. इराकचा १८ वर्ष ६ महिन्याचा माेहनाद अली हा स्पर्धेतील सर्वात युवा खेळाडू आहे. 

 

४५ संघांचे तीन वर्षांपर्यंत पात्रता सामने 
एएफसी एशियन चषकाचे यजमानपद भूषवणारा संघ स्पर्धेसाठी थेट पात्र ठरताे. उर्वरित २३ संघांसाठी आशिया खंडातील ४५ संघ पात्रता फेरीत आपले काैशल्य पणास लावतात. याची सुरुवात २०१३ पासून झाली हाेती. भारतीय संघाने ऑक्टाेबर २०१७ मध्ये पात्रता फेरीचा तिसरा सामना जिंकून प्रवेश निश्चित केला.

 

स्पर्धेत पहिल्यांदा : 
-प्रथमच २४ संघ. १६ संघ आतापर्यंत असायचे. 
-पहिल्यांदा व्हिडिओ असिस्टंट रेफरीचा (व्हीएआर) वापर. 
-प्रथमच तिसऱ्या स्थानासाठी सामना नाही. 
-पहिल्यांदा अतिरिक्त वेळेत चाैथा सबस्टिट्यूट घेण्याची संधी. 
-पहिल्यांदा येमेन, फिलिपाइन्स, किर्गिजस्तानच्या संघांनी स्पर्धेतील प्रवेश केला निश्चित. 


काेपा अमेरिकेसारखी जुनी स्पर्धा :

एशियन फुटबाॅल कॉन्फेडरेशनची स्थापना १९५४ मध्ये झाली. याच्या दाेन वर्षांनंतर लगेच एएफसी एशियन चषकाच्या आयोजनाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या स्पर्धेत चार संघ सहभागी झाले हाेते. ही जगातील सर्वात जुनी महाद्वीपीय फुटबाॅल स्पर्धा मानली जाते. दक्षिण अमेरिकेतील काेपादेखील जुनी स्पर्धा मानली जाते. 

 

४५ संघांचे तीन वर्षांपर्यंत पात्रता सामने 
एएफसी एशियन चषकाचे यजमानपद भूषवणारा संघ स्पर्धेसाठी थेट पात्र ठरताे. उर्वरित २३ संघांसाठी आशिया खंडातील ४५ संघ पात्रता फेरीत आपले काैशल्य पणास लावतात. याची सुरुवात २०१३ पासून झाली हाेती. भारतीय संघाने ऑक्टाेबर २०१७ मध्ये पात्रता फेरीचा तिसरा सामना जिंकून प्रवेश निश्चित केला. 

 

६ गट, प्रत्येकी ४ संघ 
अ गट : भारत, बहरीन, थायलंड, यूएई. 
ब गट : ऑस्ट्रेलिया, जाॅर्डन, फिलिपाइन्स, सिरिया. 
क गट : चीन, द.काेरिया, किर्गिजस्तान, फिलिपाइन्स. 
ड गट : इराण, इराक, व्हिएतनाम, येमेन. 
इ गट : काेरिया, लेबनाॅन, कतार, साैदी अरेबिया. 
फ गट : जपान, ओमान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान.