आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कतार ओपन टेनिस स्पर्धा: नाेवाक याेकाेविकची उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कतार- जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकला गुरुवारी कतार ओपन टेनिस स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी शर्थीची झुंज द्यावी लागली. मात्र, त्याने पिछाडीनंतरही बाजी मारून राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह त्याने स्पर्धेतील आपले आव्हान राखून ठेवले. सर्बियाच्या याेकाेविकने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत हंगेरीच्या मार्टन फुसकाेविक्सवर मात केली. त्याने ४-६, ६-४, ६-१ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. 

 

आता त्याचा अंतिम आठमधील सामना पाचव्या मानांकित निकाेलाज बासिलाशिविलशी हाेईल. तसेच आठव्या मानांकित थिएमचे आव्हान संपुष्टात आले. त्याला हबर्टने पराभूत केले. त्याची नजर आता ऑस्ट्रेलियन ओपनमधील अव्वल कामगिरीकडे लागली आहे. पुढच्या आठवड्यात या स्पर्धेला सुरुवात हाेईल. त्यामुळे त्याचीच रंगीत तालीम म्हणून या कतार ओपन स्पर्धेकडे पाहिले जाते. यातील किताबानेही याेकाेविकचा ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन हाेण्याचा दावा मजबुत हाेईल. त्याने यापूर्वी दाेन वेळा कतार ओपनचा किताब जिंकला आहे. त्यामुळे आता तिसऱ्या जेतेपदासाठी ताे उत्सुक आहे. त्यामुळे आता त्याच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. 

दाेन वेळच्या चॅम्पियन याेकाेविकला या विजयासाठी शर्थीची झुंज द्यावी लागली. मात्र, त्याने सरस खेळी करताना हा विजय साकारला. यादरम्यान त्याचा दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. त्यामुळे मार्टनने पहिल्या सेटमध्ये बाजी मारून आघाडी मिळवली. मात्र, त्यानंतर याेकाेविकने लढतीत बराेबरी साधली. त्याने ६-४, ने दुसरा सेट जिंकला. त्यानंतर हीच लय कायम ठेवताना त्याने तिसऱ्या सेटमध्ये बाजी मारली. 

 

वावरिंकाचा एकतर्फी विजय 
स्वीसच्या वावरिंकानेही पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. त्याने दुसऱ्या फेरीत चिलीच्या निकाेलस जेेरीवर मात केली. त्याने ६-४, ७-५ ने एकतर्फी विजय साकारला. आता त्याचा सामना स्पेनच्या आगुतशी हाेईल. ह्युज हबर्टने एकेरीच्या लढतीत राेमांचक विजयाची नाेंद केली.