आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओपन टेनिस स्पर्धा: याेकाेविकचे पॅकअप; तिसऱ्यांदा चॅम्पियन हाेण्याचे स्वप्न भंगले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोहा- जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकचे तिसऱ्यांदा चॅम्पियन हाेण्याचे स्वप्न भंगले. त्याला कतार ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागला. किताबासाठी दाेन पावलांवर असलेल्या अव्वल मानांकित याेकाेविकला उपांत्य फेरीत राॅबर्टा बतिस्ता आगुतने पराभूत केले. सातव्या मानांकित आगुतने २ तास ३० मिनिटे शर्थीची झुंज देत ६-३, ६-७, ६-४ अशा फरकाने सनसनाटी विजयाची नाेंद केली. या विजयाच्या बळावर आगुतने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये धडक मारली. याच पराभवामुळे दाेन वेळच्या चॅम्पियन याेकाेविकचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. जेतेपदापासून अवघ्या काही अंतरावर असतानाच त्याचा झालेला हा पराभव अधिकच चर्चेचा ठरला.