आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाेवाक याेकाेविक उपांत्य फेरीत; स्टॅन वावरिंकाचे आव्हान संपुष्टात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाेहा- तिसऱ्या किताबाच्या इराद्याने खेळत असलेल्या नंबर वन नाेवाक याेकाेविकने शुक्रवारी कतार ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ताे जेतेपदापासून अवघ्या दाेन पावलांवर आहे. दुसरीकडे स्वीसच्या वावरिंकाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याचे आव्हान संपुष्टात आले. 

 

सातव्या मानांकित राॅबर्टाे बाऊतिस्ता आगुतने पुरुष एकेरीच्या अंतिम आठमध्ये राेमहर्षक विजयाची नाेंद केली. त्याने सामन्यात स्वीसच्या वावरिंकाचा सरळ दाेन सेटमध्ये पराभव केला. त्याने ६-४, ६-४ अशा फरकाने सामना जिकंला. यासह त्याने अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला. पराभवामुळे वावरिंकाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्याचा या सामन्यात फार काळ निभाव लागला नाही. चाैथ्या मानांकित सेचिनांताेने उपांत्य फेरी गाठली. त्याने लाजाेविकवर मात केली. त्याने ७-६, ६-२ ने विजयाची नाेंद केली. 

 

याेकाेविकचा राेमहर्षक विजय 
अव्वल मानांकित नाेवाक याेकाेविकने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत राेमहर्षक विजय संपादन केला. त्याने पाचव्या मानांकित निकाेलाेजचा पराभव केला. त्याने ४-६, ६-३, ६-४ ने विजयश्री खेचून आणली. पिछाडीनंतर दमदार खेळी करताना त्याने हा विजय साकारला. त्यामुळे त्याला तिसऱ्या किताब जिंकण्याची आपली माेहीम कायम ठेवता आली.