आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणचे अतिक्रमण काढण्यासाठी नाथ संस्थान अाक्रमक; विराेधात एक तरुण, ३ महिलांनी केला अात्महत्येचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - तब्बल ३० ते ४० वर्षांपासून पैठणच्या संत एकनाथ महाराज मंदिर प्रशासनाच्या सर्व्हे क्र. २३३, २३५, २३७ वर ७४ कुटुंबांनी केलेले अतिक्रमण जमीनदोस्त करण्यासाठी नाथ संस्थान अधिक अाक्रमक झाले अाहे. नगर परिषद तसेच अतिक्रमण विभागाच्या पथकाने शनिवारी येथील अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला. याला स्थानिकांनी जाेरदार विराेध केला. या वेळी एक तरुण व तीन महिलांनी अंगावर राॅकेल अाेतून घेत अात्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने या ठिकाणी तणाव निर्माण झाला हाेता. दाेघा कुटुंबीयांनी पोलिस तसेच प्रशासनाचा निषेध करत अापल्याच दाेन झाेपड्यांना अाग लावल्याने पाेलिस व प्रशासनाला अाल्या पावली परतावे लागले. अाता अतिक्रमण काढण्यासाठी तहसीलदार महेश सावंत यांनी या कुटुंबीयांना अाठ दिवसांची मुदत दिली अाहे. तर दुसरीकडे प्रशासन अन्याय करत असल्याचा अाराेप करत महिलांनी पैठण पाेलिस ठाण्यात ठिय्या देत अधिकाऱ्यांवर अॅट्राॅसिटी दाखल करण्याची मागणी केली अाहे. 

पैठणच्या संत एकनाथ महाराज मंदिरामागे नाथ संस्थानची एक हेक्टर ९९ आर जमीन असून २३ कोटी रुपये खर्च करून येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे अतिक्रमण काढण्यासाठी नाथ संस्थान आक्रमक झाले आहेत.

 
दरम्यान, या ठिकाणी चारशे ते पाचशे नागरिक राहतात. हे अतिक्रमण काढून घेण्याची मागणी करत संस्थानने शुक्रवारीच पाेलिसांशी संपर्क साधला हाेता. मात्र, पाेलिस बंदाेबस्ताचे काेणतेही अादेश नसल्याने पाेलिसांनी याबाबत कारवाई करण्यास असमर्थता दर्शवली हाेती. यानंतर शनिवारी सकाळी ९ वाजता तहसील प्रशासन व नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले हाेते. मात्र, नागरिकांचा वाढता विराेध पाहता शनिवारी कारवाई न करताच पथकाला परतावे लागले. 

 

परिसराचा विकासही महत्त्वाचा 
नाथ संस्थानच्या परिसराचा विकास झाला पाहिजे यासाठी येथील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. एकाही व्यक्तीला बेघर होऊन देणार नाही. शासनाच्या विविध घरकुल योजनेतून त्यांना घरे दिली जातील. कोणी विरोध करू नये. संदीपान भुमरे, आमदार तथा अध्यक्ष, नाथ संस्थान

 

अतिक्रमणधारक कसे 
या ठिकाणी हे लोक अनेक वर्षांपासून राहतात, नगर परिषदेकडे कर भरतात. त्यांच्याकडे पी. आर. कार्डही असल्याने त्यांनी अतिक्रमण केले असे कसे म्हणता येईल. बजरंग लिंबोरे, कल्याण भुकले, जितू परदेशी, उमेश पंडुरे, पैठण. 

 

अतिक्रमण काढल्यानंतर घरकुले देऊ 
नगर परिषदेकडे येथील लाेक कर भरणा करतात. अतिक्रमण काढल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या लाेकांना जागा उपलब्ध करून दिली तर अाम्ही पंतप्रधान अावास याेजनेअंतर्गत त्यांना घरकुले देऊ. सूरज लाेळगे, नगराध्यक्ष, पैठण. 

 

जागा दिली जाईल 
संबंधित जागा ही संत एकनाथ महाराज संस्थानची अाहे. अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा दिली जाईल. त्यांच्याकडे पी.अार.कार्ड कसे अाले व ते अाहे का नाही याची माहिती घेतली जाईल. महेश सावंत, तहसीलदार, पैठण. 

बातम्या आणखी आहेत...