आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमरावती- पंतप्रधान आवास योजनेतून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साडेचार वर्षांत केवळ २६ टक्केच घरकुलांची कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली आहेत. ग्रामीण भागात मंजूर २९ हजार २५० पैकी २१ हजार ९१३ घरकुलांचे काम प्रगतीपथावर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मोठ्या प्रमाणात कामे अपूर्ण असताना आवास साॅफ्ट आणि भौतिक दृष्ट्या कशाप्रकारे ५० टक्के कामे पूर्ण झाल्याचा आभास निर्माण केल्या जात आहे.
सर्वांना हक्काचे घर मिळावे म्हणून केंद्र सरकारकडून पंतप्रधान आवास योजना हा महत्वकांक्षी योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात महापालिका, नागरी आणि ग्रामीण विभाग आदी प्रकारे योजनेचे कार्यान्वयन केले जात आहे. तिनही क्षेत्रात स्वतंत्र यंत्रणेमार्फत घरकुलाची योजना राबविली जात आहे. विकासापासून कोसो दूर असलेल्या गाव खेड्यातील जनतेपर्यंत देखील योजना अत्यंत धिम्या गतीने पोहोचत असल्याची स्थिती दिसून येत आहे. शहराप्रमाणे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. पिढी परंपरागत असलेल्या कुडा-मातीच्या घरांच्या ठिकाणी ग्रामीण भागात देखील सिमेंट काँक्रिटची घरे पंतप्रधान आवास योजनेतून उभे राहतील, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, आशा निर्माण करणाऱ्या गतिमान सरकार प्रमाणे आश्वासनाप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांची तत्वत: स्थिती झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्याच्या १४ ही तालुक्यात शहरी भाग वगळता ग्रामीण क्षेत्रात २०१६ ते २०१८ या साडेचार वर्षांत ३३ हजार ९४८ घरकुल निर्माण करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाकडून निर्धारित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने २९ हजार २५० घरकुल मंजूर करण्यात आले. मंजूूर घरकुलांची निर्मिती करता यावी चार वर्षात केवळ पहिलाच हप्त्याच्या निधी वितरीत करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण मंजूर घरकुलाची निर्मिती होण्याचे स्वप्न भंगले. मंजूर पैकी २१ हजार ९१३ घरांची कामे सुरू असून चार वर्षात केवळ ७ हजार ३३७ घरकुल पूर्ण झाल्याची स्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीतून योजनेची ही अत्यंत वाईट स्थिती जनतेसमोर आली आहे.
तीन तालुके माघारले
अमरावती, तिवसा, धामणगाव रेल्वे आदी तीन तालुके पंतप्रधान आवास योजनेच्या प्रगतीपथात माघारले आहे. या तीन तालुक्यात हजार पेक्षा कमी घरांची कामे सुरू असल्याने योजनेेची सत्यस्थिती निदर्शनास येईल.
योजनेची विदारक स्थिती अन् मुख्यमंत्र्यांचा लोकसंवाद
प्रधानमंत्री आवास योजनेची जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विदारक स्थिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र लोकसंवाद करीत आहे. महत्वकांक्षी योजनेत अपेक्षीत असलेलेयश न आल्याने मोजक्या लाभार्थ्यांना पुढे केल्या जात असल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे. अशाच प्रकारे मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओे कॉन्फरन्सद्वारे आशा नागेश जांगजोड, खारतळेगाव येथील विमल सोळंके, अमरावती येथील मेघा थोरात यांच्याशी बुधवारी संवाद साधला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.