आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र माेदी-ट्रम्प यांच्यात फाेनवरून चर्चा; व्यापार तूट, संरक्षण आदी विषयांवर साधला संवाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/वाॅशिंग्टन- पंतप्रधान नरेंद्र माेदी व अमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प यांनी साेमवारी संध्याकाळी फाेनवरून चर्चा केली. त्यात अमेरिका-भारतातील व्यापारात तूट, अफगाणिस्तानमध्ये सहकार्य वाढवणे यासारख्या विविध मुद्द्यांवर दाेघांनी संवाद साधला. या चर्चेत दाेन्ही नेत्यांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत २०१८ मधील भारत-अमेरिका सामरिक भागीदारीत वाढ झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. याबाबत व्हाइट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान माेदी व ट्रम्प यांनी २०१९ मध्ये भारत-अमेरिकेची धोरणात्मक भागीदारी मजबूत करणे व दाेन्ही देशांतील व्यापार तूट कमी करण्यासह याबद्दलचा दृष्टिकोन बदलण्याची तयारी दर्शवली. याशिवाय इंडो-पॅसिफिक क्षेत्रात संरक्षण वाढवण्यासाेबत अफगाणिस्तानमध्ये सहकार्य वाढवण्यासही सहमती दर्शवली. दरम्यान, युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हच्या कार्यालयाच्या माहितीनुसार २०१७ मध्ये अमेरिकेतील माल आणि सेवा व्यापार १२६.२ अब्ज अमेरिकन डॉलर्स, निर्यात ४९.४ अब्ज डॉलर्स व आयात ७६.७ अब्ज डॉलर्स इतकी हाेती. तसेच भारतात अमेरिकेची वस्तू, सेवा व्यापार तूट २७.३ अब्ज डॉलर्सची होती.

 

गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानातील लायब्ररी निधीबाबत ट्रम्प यांनी भारतावर टीका केली हाेती. त्या भेटीदरम्यान मोदी सातत्याने अफगाणिस्तानातील विकास कामाच्या बढाया मारत होते, असे सांगून ट्रम्प यांनी अमेरिकी संसदेत खिल्ली उडवली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...