आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आघाडीत वाद; शरद पवार, चंद्राबाबू, फारूख अब्दुल्लांना काँग्रेसचे साकडे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू/ लखनऊ- लोकसभा निवडणुका दूर असल्या तरी राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे. तीन राज्यांत विजय मिळाल्यानंतरही काँग्रेसला आपल्या सहयोगी पक्षांवर दबाव टाकण्यात यश मिळत नाही. कर्नाटकात काँग्रेस व जनता दल - सेक्युलर( जेडीएस) यांच्यात वाद सुरू आहे. जेडीएसने लोकसभेसाठी १२ जागांची मागणी केली आहे. काँग्रेसला ही मागणी पूर्ण करणे अवघड हाेत आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची मदत मागितली. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) विरोधात आघाडी करण्यासाठी येणारे अडथळे दूर करण्यासाठी या नेत्यांनी मदत करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तिन्ही नेते जानेवारीत एक महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. तीत आघाडी करण्याच्या रणनीतीवर चर्चा हाेईल. 

 

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आिण जेडीएस या यांच्यात २:१ असे सूत्र ठरले आहे. टीडीपीचे प्रवक्ता कमबमपती राममोहन राव यांनी या संदर्भात सांगितले की, सहयोगी पक्षांबराेबर लाेकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यात येणार आहे. त्यापूर्वी कर्नाटकातील जागा वाटपाच्या वादावर ताेडगा काढण्यात येईल. कर्नाटकात सत्ताधारी काँग्रेस व जेडीएस २:१ हे सूत्र वापरल्यास राज्यातील एकूण २८ मतदारसंघांपैकी १० मतदारसंघच जेडीएसला मिळू शकतात. दरम्यान, जेडीएस प्रमुख एचडी देवेगाैडा यांनी आपला पक्ष १२ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. जेडीएसला त्यापेक्षा कमी जागा दिल्या तर स्वबळावर लाेकसभा निवडणूक लढवण्याची धमकी देवेगाैडा यांनी दिली. 

 

भाजपला पराभूत करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेससमाेर उत्तर प्रदेशातही आघाडीसाठी अडचणी आहेत. काँग्रेस अजूनपर्यंत समाजवादी पार्टी किंवा मायावतींच्या बहुजन समाज पार्टीला आघाडीसाठी तयार करू शकली नाही. दरम्यान, समाजवादी पार्टीचे मुख्य महासचिव रामगोपाल यादव म्हणाले की, उत्तर प्रदेशात बसपा व सपा यांची युती निश्चित आहे. आता बसपा प्रमुख मायावती व सपाचे नेते अखिलेश यादव हे दाेन्ही नेते या युतीमध्ये अजून काेणाचा समावेश करावा, याचा निर्णय घेतील. उत्तर प्रदेशात आघाडी तयार हाेत आहे. राज्यात सपा व बसपा दोन्ही राजकीय दृष्टीने महत्त्वाचे आहेत. हे दाेन्ही पक्ष आघाडीचे नेतृत्व करतील. येत्या काही दिवसांत युतीचे चित्र स्पष्ट हाेणार आहे. उत्तर प्रदेशात युतीत काँग्रेसचा समावेश करण्याबाबत अजून काही निश्चित नाही. 

 

भाजपचा प्लॅन तयार, मोदी तीन जानेवारीपासून अभियान सुरू करतील 
केंद्रात पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली जाेरदार प्रचाराची रणनीती तयार केली गेली आहे. यामुळे भाजपने लाेकसभा निवडणुकीच्या तारखांची घाेषणा हाेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या सभांची याेजना तयार केली आहे. २० राज्यांमध्ये १०० सभा माेदी घेणार आहेत. ३ जानेवारी राेजी माेदी पंजाबातील गुरदासपूर व जालंधरमधून निवडणूक प्रचार करतील. या ठिकाणी २ सभा हाेतील. ५ जानेवारीला झारखंड, ओडिशामध्ये सभा घेतील. २२ जानेवारीला वाराणसीत जातील. २४ जानेवारीला अलाहाबादमध्ये हाेणाऱ्या कुंभमेळाव्यात सहभागी हाेतील. इतर सभांची माहिती पक्षांचे ज्येष्ठ नेते व पीएमओचे अधिकारी एकत्र बसून निश्चित करतील. 

 

धमकीचा परिणाम : एससी-एसटीचे गुन्हे राजस्थान, मध्य प्रदेशात घेणार मागे 
बसपाने पाठिंबा मागे घेण्याची धमकी दिल्यानंतर मध्य प्रदेश व राजस्थानमधील नवीन काँग्रेस सरकारने राजकीय हेतूने दाखल गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारत बंददरम्यान एससी-एसटी समुदायाच्या नागरिकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी बसपा प्रमुख मायावतींनी सोमवारी राजस्थान व मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारकडे केली हाेती. हे गुन्हे मागे न घेतले गेल्यास सरकारला दिलेला पाठिंबा मागे घेण्याची धमकी मायावती यांनी दिली. मध्य प्रदेश सरकारने एप्रिल २०१८ मध्ये भारत बंदच्या वेळी एससी-एसटी समुदायाच्या व्यक्तींवर दाखल गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला अाहे. तसेच मागील १५ वर्षांत भाजप शासनाने राजकीय हेतूने दाखल केलेले गुन्हेही मागे घेण्याचा निर्णय घेतला. कायदामंत्री पी.सी. शर्मा यांनी २ एप्रिल २०१८ चा भारत बंद व दलित हिंसेसंदर्भात दाखल गुन्हे मागे घेण्याची घाेषणा केली.