आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेडफोन गरब्यानंतर आता पाॅवर गरब्याचा ताल! जिममधील व्यायाम प्रकारांना नवा आयाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कानाला हेडफाेन लावून गेल्या वर्षी सायलेंट गरबा खेळल्यानंतर यंदाच्या वर्षी मुंबईकरांची पावले पाॅवर गरब्याच्या तालावर थिरकणार अाहेत. जिममध्ये केल्या जाणाऱ्या विविध व्यायाम प्रकारांना पारंपरिक गरब्याची जाेड देत नवरात्राेत्सवाच्या ९ दिवसांत नृत्यासह तंदुरुस्तीचा नवा अायाम अनुभवायला मिळणार अाहे.  


आज प्रत्येक जण फिटनेसबाबत जागरूक झाला अाहे. नेमका हाच धागा पकडत जिममध्ये शिकवण्यात येणाऱ्या विविध व्यायाम प्रकारांची सांगड वेगळ्या प्रकाराच्या संगीताशी घालून पाॅवर गरबा खेळला जाणार अाहे. नृत्य दिग्दर्शक व पाॅवर गरब्याचे संस्थापक सत्यजित व्हाेरा यांनी सांगितले, हा गरबा तंदुरुस्तीशी निगडित अाहे. व्यायाम प्रकारांना अनुकूल पण गरब्याचा अानंद घेता येऊ शकेल, अशा विशिष्ट प्रकारचे संगीत बनवले अाहे. 

 

खांदे, मांड्या, हृदय, स्नायूंचा लवचिकपणासाठी जिममधील व्यायाम प्रकार या संगीताच्या तालावर करता येऊ शकतील. नवरात्रीच नव्हे तर नंतरही या नव्या संकल्पनेचा अानंद घेता येऊ शकेल.  तंदुरुस्तीबराेबरच गरबा ही संकल्पना यात असल्याने जिममध्ये व्यायाम करताना हातात वापरण्यात येणाऱ्या डंबेल्सएेवजी अाेढणी, दांडिया यांचा उपयाेग करून स्काॅट्स, लंजेस, साइड लंजेस, बायसेप्स या व्यायाम प्रकारांसाठी गरब्याच्या खास स्टेप्स तयार करण्यात अाल्या असून त्यामुळे पूर्ण शरीराला व्यायाम मिळण्यात मदत हाेते. डंबेल्सएेवजी दुपट्टा प्राॅप्स म्हणून वापरल्यामुळे खांद्यांना व हातांना चांगला व्यायाम मिळताे. जिममधील व्यायाम प्रकारांना गरब्याची जाेड दिली तर त्याचा अानंद अाणि व्यायाम केल्याचे समाधान मिळण्यास मदत होईल, असे नृत्य दिग्दर्शिका वैशाली सत्रा यांनी सांगितले.  


अनावश्यक चरबी कमी होईल  
पाॅवर गरब्यामुळे हृदय, स्नायू, खांदे, मांड्या यांना चांगला व्यायाम मिळण्यास मदत हाेते. स्नायू लवचिक हाेण्याबराेबरच शरीरातील नकाे असलेली चरबी कमी हाेण्यास मदत हाेते. महिलांना व्यायामासाठी याचा चांगला उपयाेग हाेऊ शकताे. १७ ते ४० वयाेगटातील किंवा त्यापेक्षा जास्त वयाची तंदुरुस्त असलेली व्यक्ती पाॅवर गरबा खेळू शकतात, असेही व्होरा म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...