आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागामध्ये पंतप्रधान आवास योजनेतून नोव्हेंबरअखेर 793 घरे पूर्ण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यात पंतप्रधान आवास योजनेचे ग्रामीण भागात ५३०७ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ७९३ घरे पूर्ण झाली असून हे प्रमाण १५ टक्के इतके आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक २१३ घरे पूर्ण झाली आहेत. जानेवारीपर्यंत सर्व घरांच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होऊन त्यानंतर दरवर्षी घरांना गती मिळते, अशी माहिती उपायुक्त सूर्यकांत हजारे यांनी दिली आहे. मराठवाड्यात २०१६-१७ अंतर्गत ४३ हजार ४५ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३३३५१ घरे पूर्ण झाली असून ७८ टक्के घरे पूर्ण झाली आहेत. २०१७-१८ मध्ये १५१४५ घराचे उद्दिष्ट होते. ६३१४ घरे पूर्ण झाली असून ४२ टक्के घरे पूर्ण झाली आहेत. 

 

औरंगाबाद जिल्ह्यात या वर्षी २१३ घरे पूर्ण :
औैरंगाबाद जिल्ह्यात यावर्षी ग्रामीण भागात ९७८ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ८३६ घरांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ७९३ जणांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. तसेच २१३ घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून हे प्रमाण केवळ २१.७८ टक्के आहे. २०१७-१८ मध्ये २३९६ उद्दिष्ट देण्यात आले असून ११७५ घरे पूर्ण झाली आहेत. २०१६-१७ मध्ये ६८६३ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ५४१३ घरे पूर्ण झाली आहेत. यावर्षी हिंगोली जिल्ह्यात ४२१ पैकी केवळ ६९, नांदेड - २१३० पैकी २१४, उस्मानाबाद १७८ पैकी ४५, बीड ६७९ पैकी १७० घरे पूर्ण झाली आहेत. 

 

दीड लाख रुपये अनुदान 
पंतप्रधान आवास योजनेसाठी एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान मिळते. तसेच शौचालयासाठी १२ हजार आणि मजुरीचे १८ हजार असे ३० हजार इतर अनुदान दिले जाते. त्यामुळे दीड लाख रुपये घरासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. यामध्ये पहिला हप्ता २५ हजार त्यानंतर दुसरा आणि तिसरा हप्ता ३० हजारांचा, चौथा २५ हजार आणि पाचवा दहा हजारांचा हप्ता दिला जातो. 

 

बातम्या आणखी आहेत...