ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुजरात : मोरबीतील केराला गावातील कार पार्किंग नव्हे, तर नाशिकहून मागवलेल्या 25 हजार डाळिंबांची झाकलेली कलमे
वांकानेर (मोरबी)- गुजरातमधील ही दुचाकी अथवा कार पार्किंगची जागा नव्हे. तर डाळिंबाच्या शेतीचे एरियल व्ह्यू छायाचित्र आहे. केराला गावातील प्रगतिशील शेतकरी आधुनिक पद्धतीने डाळिंबाची शेती करत आहेत.महाराष्ट्रातील नाशिक येथून खास २५ हजार कलमे आणून येथे लावण्यात आली. आता ही झाडे डाळिंबांनी बहरली आहेत. फळांचे पक्ष्यांपासून रक्षण करण्यासाठी ती पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवली आहेत.