आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लिपस्टिकसारखे असते राजकीय नेत्यांचे रूप; पुणे उपमहापौर धेंडें

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तींची दाेन रूपे असतात. एक रूप म्हणजे त्यांचे मूळ चळवळीत काम करण्याचे, तर दुसरे रूप म्हणजे राजकीय. या रूपात नेत्याला काेणाच्याही भावना दुखवायच्या नसतात तसेच त्याच्या प्रत्येक शब्दाचा राजकीय अर्थ काढला जात असताे. त्यामुळे राजकीय रूप हे लिपस्टिकसारखे असते, असे वक्तव्य पुण्याचे उपमहापाैर सिद्धार्थ धेंडे यांनी शुक्रवारी केले. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त १९४२ अखिल भारतीय महिला परिषदेच्या वतीने आयाेजित राष्ट्रीय महिला परिषदेत ते बाेलत हाेते. 


डाॅ. धेंडे म्हणाले, भिडे वाड्याजवळ पश्चिमेला दगडूशेठ वाडा आहे. ज्या महिला दगडूशेठ वाड्याच्या दिशेने गेल्या त्या आयुष्यभर माथा टेकवत राहिल्या, तर ज्या पहिला भिडे वाड्याच्या दिशेने आल्या त्या महिलांची प्रगती हाेऊन त्यांचे मानसिक शुद्धीकरण झाले. एक भिडे सांगतात, आंबा खाल्ल्यावर मुलगा हाेईल, तर फुले सांगतात मुलगा-मुलगी एकच आहे. दरम्यान, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा यासाठी पुणे मनपात ठराव करण्यात आल्याचे ते म्हणाले.