आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रफालचा वाद : रिलायन्स केवळ 10 % भागीदार, 30 कंपन्यांशी करार झाला : डॅसो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - भारतासोबत ३६ रफाल विमानांसाठी करार करण्यासाठी आम्ही १०० हून जास्त भारतीय कंपन्यांशी चर्चा केली होती. त्यापैकी ३० कंपन्यांशी भागीदारी केली. त्यात रिलायन्सचीही भागीदारी आहे. त्यांचे शेअर केवळ १० टक्के आहेत, अशा शब्दांत रफाल निर्मिती करणाऱ्या डॅसो या फ्रेंच कंपनीने काँग्रेसच्या आरोपांना उत्तर दिले आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपर म्हणाल्या, रिलायन्सला भागीदारी द्यावी यासाठी भारत सरकारने कसलाही दबाव टाकला नव्हता. भारत सरकारने रिलायन्सचे नावाची शिफारस केल्याचा दावा फ्रेंच मासिकाने केला होता. त्या पार्श्वभूमीवर एरिक यांनी हे स्पष्ट केले आहे. फ्रेंच मासिकाच्या दाव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या करारात अनिल अंबानी यांच्या कंपनीला ३० हजार कोटी रुपयांचा फायदा पोहोचवला होता, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. दुसरीकडे संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण शुक्रवारी फ्रान्सच्या दौऱ्यावर पोहोचल्या. डॅसो कंपनीने भेटीचे निमंत्रण दिले होते. कारण आपण खरेदीदार आहोत. त्यामुळे तेथे जाऊन सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्या पाहिजेत, यासाठी ही भेट असल्याचे त्यांनी सांगितले. सीतारमण यांनी पॅरिसमध्ये पत्रकार परिषद घेऊन सर्व गोष्टींना पुन्हा मांडल्या. 

 

भाजप म्हणाले- काँग्रेसचा एकानंतर एक खोटारडेपणा 
भाजप नेते व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, काँग्रेसने कितीही खोटारडेपणा केला म्हणून सत्य बदलणार नाही. गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हणाले, काँग्रेस रफालवर खोट्या गोष्टींचा प्रचार करू लागली आहे. फ्रेंच माध्यमांनी खोटे वृत्त दिले होते. त्याचे डॅसो कंपनीच्या सीईआेने खंडण केले आहे. कदाचित २०१२ मध्ये गांधी परिवारास लाभ पोहोचवण्याच्या उद्देशाने प्रयत्न झाले. आरोपानंतर त्यांच्या काळ्या गोष्टी लपवता येतील, असे काँग्रेसला वाटते. 
पहिले खोटे- फ्रेंच माध्यमांच्या बातमीला फिरवले. डॅसोच्या सीईआेंनी स्वत: समोर येत सर्व आरोपांचे खंडन केले. 
दुसरा - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासह ट्विस्ट करण्यात आले. रफालची किंमत जाणून घ्यायची नाही, असे कोर्टाने स्पष्ट म्हटले होते. 
तिसरा - संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याची बदली करून सुटीवर पाठवले. वास्तविक ते प्रशिक्षणावर गेले होते. 
चौथा - फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींच्या नावावर खोटे पसरवण्याचेही काम केले. त्याचे खंडन माजी राष्ट्रपती आेलांद यांना करावे लागले. 
पाचवा - राहुल म्हणाले होते, आेलांद यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी अपशब्द वापरले. त्याचे स्वत: आेलांद यांनी खंडन केले. 
सहावा - राहुल गांधी फ्रान्सच्या राष्ट्रपतींना भेटल्याचा दावाही संसदेत करत करारात गोपनीयता नसल्याचे म्हटले होते. फ्रान्सने खंडन केले. सातवा - रफालचे वेगवेगळे दर सांगण्यात आले होते. 
आठवा - कराराच्या बाबतीत संसदीय समितीला अंधारात ठेवल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. ते खोटे रेटून बोलत आहेत. 

 

संरक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण - डॅसोने अंबानींना निवडल्याचे माहिती नव्हते 
संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी पॅरिसमध्ये पत्रकार परिषदेत पुन्हा रिलायन्सबाबत स्पष्टीकरण दिले. डॅसोने अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्सची निवड केली आहे, याची केंद्र सरकारला काहीही कल्पना नव्हती, असा दावा त्यांनी केला. खरे तर ३६ रफाल विमानांची खरेदी करण्याचा करार हा दोन सरकारमधील आहे. त्यात एखाद्या व्यक्तीच्या कंपनीचा उल्लेख नाही, असे सीतारमण यांनी सांगितले. देशात काँग्रेसने मोदींविरोधात आरोपांचे सत्र लावले आहे. हा दौरा म्हणजे वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न असल्याचे राहुल गांधी म्हटले होते. 

बातम्या आणखी आहेत...