आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी जयंतीला प्रदर्शित होणार नाही राकेश मेहराचा 'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टटेन्मेंट डेस्क: बऱ्याच दिवसांपासून एकाच दिवशी दोन ते तीन चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. त्यामुळे छोट्या बजेटच्या चित्रपटांना मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे राकेश ओमप्रकाश मेहराच्या आगामी 'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर' चित्रपटासाठी नव्या तारखेचा शोध घेतला जात आहे. हा चित्रपट आधी गांधी जंयतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. खरं तर, गांधी जयंतीच्या आधीच 'पटाखा' आणि 'सुई धागा : मेड इन इंडिया' रिलीज होणार आहे. तर जयंतीच्या तीन दिवसानंतर 5 ऑक्टोबर रोजी 'लवरात्री' आणि 'अंधाधुन' रिलीज होईल. या चारी चित्रपटामुळे चित्रपटाला नुकसान होऊ नये, अशी मेहरा यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी तारीख बदलण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाची थीम स्वच्छता अभियानाशी निगडित आहे. 

बातम्या आणखी आहेत...