आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शासकीय इतमामात अंत्यसंस्काराचा विसर; पद्मश्री आचरेकर सरांना निराेप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सचिन तेंडुलकरसह अनेक कसोटी व रणजी क्रिकेटपटू घडवणारे आणि केंद्र सरकारचा गुरू द्रोणाचार्य पुरस्कार तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले रमाकांत आचरेकर यांना गुरुवारी निराेप देण्यात आला. मात्र, प्राेटाेकाॅल असतानाही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र शासनावर सर्व क्रिकेटप्रेमी व क्रीडाप्रेमी नागरिकांकडून टीका होत आहे. सिनेतारका श्रीदेवींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केल्यानंतर सरकारने त्या पद्मश्री असल्याचा खुलासा केला होता. आचरेकर यांनादेखील पद्मश्री या सन्मानाने भूषवण्यात आले होते. तर मग सरकारने आचरेकर सरांना शासकीय इतमामात निरोप का दिला नाही ? यासंदर्भात जबाबदारी असणारा सामान्य प्रशासन विभाग झोपला होता का? मुख्यमंत्र्यांकडे या विभागाची सूत्रे असतात. क्रीडामंत्री विनोद तावडे यांनीदेखील याबाबत सारवासारव केल्याचे लक्षात येते.

 

यासंदर्भात शासकीय काही शिष्टाचार असतात असे ते म्हणाले. क्रिकेटपटूंचे आवडते गुरू रमाकांत आचरेकर यांचे बुधवारी सायंकाळी मुंबईत निधन झाले. गुरुवारी सकाळी दादर येथील भागोजी कीर स्मशानभूमीत तमाम क्रिकेटप्रेमींनी साश्रुनयनांनी आचरेकर सरांना निरोप दिला. 

 

राज ठाकरे यांची टीका : 
'भारतरत्न सचिन आणि त्याच तोडीचे एकाहून एक उत्तम क्रिकेटपटू घडवणारे रमाकांत आचरेकर सर 'पण' पद्मश्री होते मग त्यांचे अंत्यसंस्कार सरकारी इतमामात का नाही झाले? सरकारने ह्याचं उत्तर द्यायलाच हवं.' अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टि्व्ट करून टीका केली. इतर चाहत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. 

 

प्राेटाेकाॅल असूनही दुर्लक्ष; हलगर्जीपणावर टीका 
तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ७ एप्रिल २०१० राेजी रमाकांत आचरेकर यांना पद्मश्री पुरस्काराने गाैरवण्यात आले हाेते.