आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​'रेस 3'मध्ये इतरांच्याही चुका होत्या, पण खापर मात्र माझ्यावरच फोडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेल्क: रेमो डिसूजाच्या 'रेस 3' चित्रपटाला सोशल मीडिया आणि समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला नाही. रेमोलाच सर्वांनी दोषी ठरवले, सलमान खानकडे कोणीच बोट दाखवले नाही, सर्व चूक रेमोची असल्याचे दाखवले. चित्रपट कंटाळवाणा असल्याचा आरोपही रेमोवर लावण्यात आला. या सर्व विषयावर रेमोने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता त्याने मौन तोडले आहे. त्याने सलमानकडे इशारा करत बाकीच्या टीमलाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. तो म्हणाला...,'स्क्रिप्टवर चांगले काम झालेच नव्हते. त्या आधीच चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली होती.' रेमोने ऑन रेकॉर्ड याला आपली सर्वात मोठी चूक मानली आहे. 


तो पुढे म्हणाला..., 'रेस3' ची मला स्क्रिप्ट देण्यात आली होती. त्यांना जसा चित्रपट हवा होता मी तसाच बनवून दिला होता. मी माझे काम मनापासून चांगले करून दिले होते. आता त्याता सर्वांकडूनच काही ना काही उणीव राहिली असेलच, मात्र खापर माझ्याच डोक्यावर फोडण्यात आले. त्याला मी काहीच करू शकत नाही. खरं तर, 'रेस 3' चित्रपटातून मी धडा घेतला आहे. आता कुणीही मला स्क्रिप्ट दिली तर मी कधीच डोळे बंद करून त्यावर चित्रपट बनवणार नाही. असो, हा सर्व चित्रपट मेकिंगचा भाग आहे. अपयशाची चव येथे कधी ना कधी चाखावीच लागते. बरेच िनर्माते आहेत, ज्यांचा पहिला चित्रपट हिट ठरला आणि दुसरा अापटला. प्रत्येकाचा चित्रपट कधी ना कधी फ्लॉप ठरलाच आहे, मी एकमेव नाही. राजू हिरानीसारखे एखादेच असतात, ज्यांचे सर्व चित्रपट सुपरहिट ठरतात. चित्रपटाचे हिट होणे सर्वस्वी प्रेक्षकांवर अवलंबून असते. 


आता मी पुढे कधीच असे करणार नाही, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी शिकवण आहे. आता चित्रपट पूर्ण झाल्यावरच रिलीज डेटची घोषणा करीन. 

बातम्या आणखी आहेत...