आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबरीमालात चौथ्या दिवशीही गोंधळ, महिलांचे वय तपासले; नंतरच दर्शनास सोडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सबरीमाला - केरळच्या सबरीमालामध्ये भगवान अयप्पा मंदिरात १० ते ५० वर्षांच्या महिलांना प्रवेश देण्यावरून शनिवारी चौथ्या दिवशीही वाद सुरूच होता. भक्तांनी १० ते ५० वर्षे वयाच्या महिलांना मंदिरात प्रवेश करू दिला नाही. सबरीमाला पर्वतावर ५० वर्षांहून कमी वयाची एक महिला पोहोचल्याची अफवा पसरल्यामुळे मंदिराच्या बाहेर मोठ्या संख्येने लोक जमले होते. त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर महिलेचे वय ५२ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले. तमिळनाडूची या महिलेस कुटुंबियांसह मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली. 


त्रावणकोर देवस्वोम मंडळाने सबरीमाला तंत्री कुटुंबाच्या धमकीस नाकारले. त्यात महिला प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा मंदिर बंद करण्याची सूचना करण्यात आली होती. टीडीबी सदस्य के.पी. शंकर दास म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने सर्व महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. मंदिर बंद ठेवणे अयोग्य ठरेल. मंदिराचे कर्मचारी तंत्र यांनी धरणे किंवा निदर्शने करणे चुकीचे आहे. त्यावर स्पष्टीकरण मागितले जाईल. 


शुक्रवारी दोन महिला मंदिरापर्यंत पोहोचल्या होत्या. परंतु तेथे त्यांना तंत्री कांतारारु राजीवेरूने मंदिरात जाण्यास मनाई केली होती. टीडीबीने राजीवेरू यांचे पाऊल चुकीचे असल्याचे म्हटले आहे. परंतु मलिकेपुरम मंदिराचे मुख्य पुजारी अनीष नामपुथी म्हणाले, राजीवेरु यांनी काहीही चुकीचे केले नाही. त्यांनी वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेचे पालन केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...