आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबरीमाला: मंदिरात दर्शनास जाणाऱ्या 11 महिलांना निदर्शकांनी रोखले; तीर्थयात्रेचा पहिला टप्पा आता समारोपाच्या दिशेने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम - केरळच्या सबरीमालातील अयप्पा मंदिरात निदर्शकांनी रविवारी दर्शनासाठी जाणाऱ्या ११ महिलांना रोखले. चेन्नईतील मनिथी नावाच्या संघटनेने या भाविकांना पाठवले होते. मात्र त्यांना दर्शनाविनाच परतावे लागले. या महिलांना पोलिस संरक्षणात पंबा बेस तळावर आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मदुराईला परतावे लागले. या प्रकरणात पोलिसांनी २५ निदर्शकांना ताब्यात घेतले. त्या दरम्यान शेकडो निदर्शक सबरीमाला डोंगराजवळ जमा झाले होते. निदर्शकांनी कोट्टायम रेल्वे स्थानकाबाहेर  महिलांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

 

मनिथीचे संयोजक सेल्वे म्हणाल्या, आम्हाला सुरक्षेची हमी मिळाली होती. अयप्पांच्या दर्शनासाठी आम्ही पहाटे साडे पाचच्या सुमारास पंबा येथे दाखल झालो होतो. डोंगर चढाईसाठी सुरक्षेची मागणी केली होती. परंतु पोलिसांनी योग्य सहकार्य केले नाही. पोलिस अधीक्षक कार्तिकेयन म्हणाले, पथानामथिट्टा जिल्ह्यात २७ डिसेंबर पर्यंत कलम १४४ लागू आहे.

निदर्शकांवर दोन गुन्हे दाखल आहेत. सबरीमाला तिर्थयात्रेच्या पहिल्या टप्प्यातील समारोप लवकरच होणार आहे. अखेरचे चार दिवस बाकी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेशाची परवानगी दिली होती. तेव्हापासून वाद सुरू आहे. 

 

भाजपच्या मते-प्रवेश करू इच्छिणाऱ्या भाविक नव्हत्या

भाजपने तिरुवनंतपुरममध्ये मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या बंगल्यासमोर निदर्शने केली. केरळ भाजपाध्यक्ष पी.एस. श्रीधरन म्हणाले, राज्य सरकार मंदिर परिसराला युद्धक्षेत्र बनवू इच्छिते. मंदिरात प्रवेश करू पाहणाऱ्या महिला भाविक नव्हता. या प्रकरणाचा तपास एनआयएद्वारे करायला हवा. भाजप सोमवारी राज्यभर निदर्शने करणार आहे. 

 

केरळ सरकार म्हणाले- आम्हाला सबरीमालामध्ये शांतता हवीये
पंडालम राजपरिवाराच्या मते, डाव्या सरकारने महिलांना पोलिसांच्या मदतीने मंदिर परिसरापर्यंत पोहोचवले. त्यावर राज्य सरकारचे मंत्री इ.पी. जयराजन म्हणाले, सरकार भाविकांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध आहे. आम्हाला सबरीमाला परिसरात शांतता हवी आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते रमेश चेन्निथाला यांनी अयप्पा मंदिरास नष्ट करण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.

 

अम्मिनी ५० किमीहूनच परतल्या होत्या
केरळच्या सामाजिक कार्यकर्त्या अम्मीनी यांनीही सबरीमाला मंदिरात प्रवेशाची घोषणा केली होती. मात्र विरोध पाहता त्या ५० किमी अंतराहून परतल्या होत्या. 

बातम्या आणखी आहेत...