तिरुवनंतपूरम- केरळमधील सबरीमालाबाबत सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी महिलांनी ६२० किमी लांब महिला भिंत उभारण्यात आली. उत्तर केरळच्या कसोरगोड ते दक्षिणेकडील तिरुवनंतपूरम जिल्ह्यापर्यंत मानवी भिंत बांधली. कसोरगोडमध्ये आरोग्यमंत्री के.के. श्यालजा यांनी याचे नेतृत्व केले. तिरुवनंतपूरमध्ये माकपा नेत्या वृंदा कारत उपस्थित होत्या. महिलांना समान दर्जा देण्याची मागणी त्यांनी केली. विशेष म्हणजे, सर्वाैच्च न्यायालयाने सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याची परवानगी दिली आहे. निर्णयाच्या दोन महिन्यानंतरही १० ते ५० वयाच्या महिलांना प्रवेश नाकारला जात आहे. यास हिंदुत्वादी संघटना व भाजपचा विरोध आहे.
महिलांना रोखण्यासाठी दोन महिन्यांपासून आंदोलन होतेय
गेल्या २८ सप्टेंबरला आलेल्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाआधी १० ते ५० वयाच्या महिलांना मंदिर प्रवेशास परवानगी नव्हती. विविध संघटना १५०० वर्षे जुन्या प्रथेचा हवाला देत विरोध करत आहेत. भगवान अय्यप्पा ब्रह्मचारी होते, हे त्यासाठीचे कारण होते. अशा स्थितीत युवा व किशोरवयीन महिलांना मंदिर प्रवेशास परवानगी नाही.
जातीय शक्तींमुळे वातावरण खराब
सबरीमालामध्ये महिला विरोधातील जातीय शक्तींच्या निदर्शनामुळे सरकार व अन्य पुरोगामी संघटनांना ही भिंत उभी करण्यास प्रेरणा दिली आहे. आम्ही कुणालाही केरळला अंधार युगात घेऊन जाण्याची परवानगी देणार नाहीत.
-पिनराई विजयन, मुख्यमंत्री केरळ