आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : संजय लीला भन्साळीच्या 'इंशाअल्लाह' मध्ये दीपिका पदुकोण सलमान खानसोबत दिसणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून इंडस्ट्रीत सुरू होती. मात्र, सूत्राच्या महितीनुसार, भन्साळी अजून स्क्रिप्टवर काम करत आहेत. स्क्रिप्ट पूर्ण होताच ते चित्रपटातील कलाकारांच्या नावाची घोषणा करतील. खरं तर, 'इंशाअल्लाह' देखील चित्रपटाचे तात्पुरते टायटल आहे. पुढे याचे नाव बदलू शकते. गेल्या वर्षीच सलमान खानने या चित्रपटाविषयी सांगितले होते. मी संजयच्या आगामी चित्रपटात काम करू शकतो. मात्र, अजून काही अधिकृत घोषणा झालेली नाही. सूत्राच्या माहितीनुसार..., दीपिकादेखील या चित्रपटात करणार आहे. दीपिका आणि भन्साळींमध्ये चांगली मैत्री आहे. तिने भन्साळींच्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. त्यामुळे ती त्यांना नाही म्हणणार नाही. हा चित्रपट 2020 पर्यंत रिलीज होऊ शकतो.
दीपिकाने आतापर्यंत सलमान खानसोबत काम केलेले नाही. तिला 'किक' आणि 'सुल्तान' ऑफर झाले होते. मात्र, इतर चित्रपटांमुळे ती यात काम करू शकली नव्हती. 'पद्मावत'नंतर दीपिकाने एकही चित्रपट साइन केलेला नाही. त्यामुळे ती हा चित्रपट करू शकते, अशी शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.