आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजस्थानात सांवलियाजी मंदिराचे उघडले भांडार; भाविकांनी महिन्यात अर्पण केली 3 कोटींहून अधिक रक्कम, मोजण्यास लागले 10 तास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्तोडगड- राजस्थानातील चित्तोडगड येथील सांवलियाजी कृष्णधाम येथे शुक्रवारपासून मासिक मेळा सुरू झाला आहे. पहिल्या दिवशी देवाचे भांडार उघडले. यात तीन कोटी १५ लाख १९ हजार ५०० रुपयांच्या नोटा निघाल्या. या नोटा मोजण्यासाठी सुमारे ३५० लोकांना साडेदहा तास लागले. देवाच्या भांडारात सोने-चांदी व चांदीची एक छोटी बाइक दानात आली होती. हे दान भाविकांनी गेल्या एक महिन्यात केलेले होते. मंदिर मंडळाचे प्रशासकीय अधिकारी कैलासचंद्र दधिच यांनी सांगितले, रुपयाची मोजदाद सकाळी ११ वाजता सुरू झाली ती रात्री साडेनऊपर्यंत चालली. लहान नोटा व नाण्यांची मोजदाद होणे बाकी आहे. गेल्या वर्षी याच दिवशी भांडारात दोन कोटी ३४ लाख १९ हजार रुपये आले होते. 

 

दर अमावास्येला उघडले जाते सांवलियाजी मंदिराचे भांडार 
कैलासचंद्र दधिच यांनी सांगितले, देवाचे भांडार दर अमावास्येला उघडण्यात येते. म्हणजे वर्षातून १२ वेळा भांडार उघडले जाते. जानेवारी महिन्यात आलेली अमावास्या विशेष असते. कारण या काळात मासिक यात्रा असते. भांडारातील रुपये मोजण्यासाठी बँक व मंदिर मंडळाचे कर्मचारी सहभागी असतात. ३५० लोकांनी रुपयांची मोजदाद केली.