आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळकरी मुलांच्या अॅपेला अपघात; चालकाजवळ बसलेल्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाेरगाव मंजूराष्ट्रीय महामार्गावर सोयाबीन फॅक्टरीसमोर निपाणाहून बोरगाव मंजू व अकोल्यात शिक्षणासाठी येत असलेल्या शाळकरी मुलांच्या अॅपेला अपघात झाला. त्यात अॅपेच्या चालकाजवळ बसलेली अकरावीची विद्यार्थिनी बाहेर फेकली गेली. आयशरच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अवैध वाहतुकीचा तालुक्यातील आठ दिवसांतील हा दुसरा बळी आहे.

 

निकिता चंद्रकांत राऊत, प्राजक्ता मनोज राऊत, शुभम राजेंद्र राऊत, सनवी राजेंद्र निचळ, व पूजा राजेंद्र इंगळे या विद्यार्थांना घेऊन अॅपे क्र. एमएच४०-एके०२९९ चा चालक शेषराव इंगळे निपाणाहून अकोलासाठी निघाला होता. त्यात पूजा इंगळे ही बोरगाव मंजू येथील क.बा. सोमाणी महाविद्यालयात अकरावीत शिकत असल्याने तिला बोरगाव मंजूला सोडायचे होते. मात्र बोरगाव येण्यापूर्वीच समोरून भरधाव येणाऱ्या आयशर क्र. एमएच४०-एके०२९९ ने विद्यार्थ्यांच्या अॅपेला जबरदस्त धडक दिली. यात अॅपेचा अक्षरशः चुराडा झाला. पूजा ही चालकाच्या जवळ बसलेली असल्याने ती ऑटोमधून फेकल्या गेली. इतक्यात ती आयशरच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

 

पूजा ही निपाणा येथील सरपंच कुमुदिनी इंगळे यांची मुलगी आहे. या अपघातात निकिता राऊत, प्राजक्ता राऊत, शुभम राऊत, सनवी निचळ हे गंभीर जखमी झाले. या विद्यार्थ्यांवर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातातील सर्व गंभीर जखमी निपाणा येथील अाहेत. या दुर्घटनेचा तपास ठाणेदार विजय मगर यांच्या मार्गदर्शनात एएसआय अशोक पितळे, नामदेव केंद्रे व प्रवीण वाकोडे करीत आहेत.


१०८ अॅम्ब्युलन्स पोहोचली १ तास उशिरा : अपघात घडल्यानंतर १०८ अॅम्ब्युलन्स एक तास उशिराने पोहोचल्याने जखमी विद्यार्थांना तत्काळ उपचार मिळू शकले नाहीत. तसेच जखमींना बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यावर डॉक्टर व नर्स उपस्थित नसल्याने त्यांच्यावर उपचार झाले नाहीत. त्यामुळे उशिराने या सर्व जखमींना अकोल्यात दाखल केले.
अवैध वाहतुकीचा आठवड्यातील दुसरा बळी : अवैध वाहतुकीमुळे आठवडाभरात दोन बळी गेले आहेत. अकोल्यातील डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रक खाली आल्याने वैद्यकीय प्रतिनिधीचा मृत्यू झाला. तर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असलेल्या ऑटोला दुसरा अपघात झाल्याने पूजाचा बळी गेला. आता तरी पोलिस अवैध वाहतुकीला लगाम लावणार की नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

बातम्या आणखी आहेत...