आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातव्या राज्य विदर्भ प्रादेशिक वैज्ञानिक परिषदेत विचारमंथन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- इंडियन डेंटल असोसिएशन शाखेद्वारे सातवी राज्य विदर्भ प्रादेशिक वैज्ञानिक परिषद येथे आयोजित केली होती. व्यासपीठावर महाराष्ट्र इंडियन डेंटल असो. चे अध्यक्ष डॉ. अभय कोलते नागपूर, डॉ. नितीन बर्वे पूणे, शाखाध्यक्ष डॉ. पराग इंगोले, सचिव डॉ. अभिषेक तिडके, डॉ. अनंत हेडा उपस्थित होते. 


डॉ. पराग इंगोले, डॉ. अभिषेक तिडके यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविकात डॉ. पराग इंगोले यांनी असो. ने राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या वेळी डॉ. सुनील जवळेकर, डॉ. अरुण तारे यांना श्रद्धांजली वाहिली. डॉ. नितीन बर्वे यांनी स्व. डॉ. सुनील जवळेकर यांच्या कार्याचा उल्लेख केला. त्यांच्या जाण्याने शहराची हानी झाली. इंडियन डेंटल असो. शाखेच्या कार्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. डॉ. अभय कोलते यांनी दंत चिकित्सकांनी आधुनिक तंत्रज्ञान कसे वापरावे या बाबत माहिती दिली. डॉ. श्रीरंग सेवेकर मुंबई यांनी लहान मुलांना गुंगी देण्यासाठी आधुनिक पद्धतीने देण्यात येणाऱ्या नाईट्रस ऑक्साईडचा वापर लहानथोरांसाठी केल्यास त्याचे फायदे काय यावर प्रकाश टाकला. डॉ. अभिजित लेले पूणे यांनी ऑक्लूजल व्हिनियर यावर डॉक्टरांनी आधुनिक पद्धतीचा वापर करुन दातांसाठी लागणाऱ्या कॅप लेबॉरटरी मधून न मागवता तयार केल्यास फायदा होतो. 


डॉ. दीपाली पाटेकर पूणे यांनी प्रॅक्टीस मॅनेजमेंट यावर उत्कृष्ट व्यवस्थापनाचा नमुना सादर करुन सर्वांचे समाधान कसे करता येईल हे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. राहुल कोठारी यांनी तर आभार डॉ. अभिषेक तिडके यांनी मानले. डॉ. प्रतिभा इंगोले, डॉ. हर्षल ठाकरे, डॉ. सुनील मारवाल, डॉ. विक्रांत भागवत, डॉ. गिरीश राठी, डॉ. प्रितेश गांगळे, डॉ. दुष्यंत आलिमचंदानी, डॉ. सचिन वानखडे, डॉ. नुपुर तिडके, डॉ. अमरीश गोयनका, डॉ. अमोल गावधनी यांचा आयोजनात सहभाग होता. 

बातम्या आणखी आहेत...