आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथा v/s कायदा केरळमध्ये महिलांना रोखले, बसमधून खाली उतरवले, सबरीमाला मंदिरात आज शक्तिप्रदर्शन!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निलाक्कल - केरळचे सबरीमाला मंदिर बुधवारी उघडणार आहे. मात्र त्याआधीच मंगळवारी भगवान अय्यप्पांच्या हजारो भक्तांनी मंदिराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर ठिय्या दिला. महिलांच्या मंदिर प्रवेशाला केरळमध्ये प्रचंड विरोध केला जात आहे. 

 

मंदिरात महिला प्रवेशाबाबत सुप्रीम कोर्टाच्या २८ सप्टेंबरच्या आदेशाविरुद्ध १० दिवसांपासून निदर्शने करणाऱ्या हिंदू संघटनांनी जागोजागी वाहने रोखून महिलांना माघारी पाठवले. १० ते ५० वर्षे वयोगटातील एकही महिला मंदिराकडे जाऊ शकली नाही. महिलांचा एक समूह बसमधून मंदिराचा बेस कॅम्प पांबा येथे दाखल झाल्याने निलाक्कलमध्ये तणाव निर्माण झाला. निदर्शने करणाऱ्या महिला भाविकांनी मंदिराकडे जाणाऱ्या बस रोखून सर्व महिलांना बळजबरीने खाली उतरवले. यात अनेक पत्रकार महिलांनाही पिटाळण्यात आले. 

 

१५ दिवसांपासून ठिय्या नायर सेवा समाज, श्री नारायण धर्म परिपालन व अय्यप्पांच्या भक्तांच्या ६ संघटना १५ दिवसांपासून निदर्शने करत आहेत. तिरुवनंतपुरममध्ये एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलांच्या मंदिर प्रवेशाला सर्व संघटनांनी विरोध केला आहे. 

 

भाजपनंतर काँग्रेसचाही विरोध, डाव्या पक्षांचे मात्र मौन 
कोर्टाच्या निकालाविरुद्ध भाजप व शिवसेनेने ५ दिवसांची यात्रा काढली. काँग्रेस खासदार अँटोनी महिला काँग्रेस, इंडियन युनियन मुस्लिम लीग व केरळ काँग्रेसच्या निदर्शनांचे नेतृत्व करत आहेत. डावे पक्ष मात्र गप्प आहेत. 

 

फेरविचार याचिका नाही 
मुख्यमंत्री पी. विजयन म्हणाले, आमचे सरकार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करणार नाही. महिलांना पिटाळण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, महिलांना मंदिर प्रवेशापासून रोखणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. 

बातम्या आणखी आहेत...