आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिदची पत्नी जाहिरातीनंतर चित्रपटात कधी दिसणार? शाहिदने केला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतने नुकतेच एका जाहिरातीचे चित्रीकरण केले आहे. हे तिच्या पहिल्या जाहिरातीचे चित्रीकरण होते. त्यामुळे ती लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करू शकते, अशी चर्चा सध्या इंडस्ट्रीत आहे. नुकतेच याविषयी शाहिदला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की..., मीरा जेव्हा पत्रकार परिषद घेईल तेव्हा तिलाच तो प्रश्न विचारा. तिला पूर्ण स्वातंत्र्य आहे. तिला जे करायचे आहे, ती करू शकते. मी कधीच तिला आडवत नाही. शाहिद आणि मीरा दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. 

 

अँटीएजिंग क्रीम जाहिरातीत केले काम
मीरा राजपूतने अखेर अॅक्टिंग वर्ल्डमध्ये पदार्पण केले आहे. ती लवकरच आई होणार आहे. तिने पहिली जाहिरात ही अँटीएजिंग क्रीमसाठी केली आहे. ही जाहिरात रिलीज होताच ट्रोलर्सने मीरावर निशाना साधला आहे. सोशल मीडिया यूजर्स म्हणत आहेत की, ज्या अँटी-एजिंग क्रिमची जाहिरात करताना मीरा क्रिमचे गोडवे गात आहे. ती क्रिम मुळात तिच्यासाठी नाहीच, कारण मीरा अजून वयाने खुप लहान आहे. ती तरुण आहे. तर काही यूजर्स तिला ट्रोल करत म्हणत आहेत की, मीरा करीना कपूरला कॉपी करतेय.


सोशल मीडियावर केले होते ट्रोल 
- एका यूजरने लिहिले - "मीरा अवघ्या 23 वर्षांची आहे. मला नाही वाटत की, तिला ओलेची गरज आहे." तर एका यूजरने लिहिले "मला कळत नाहीये की, मीरा आपली लिमिट क्रॉस करु शकते. मीराला फक्त लाइमलाइटमध्ये राहायचे आहे. पहिले स्वतःच म्हणायची की, जसे आहात तसे राहा आणि आता दूस-यांना कॉपी करतेय."
- सोशल मीडियावर यूजरने लिहिले, करीनाला कॉपी करणे बंद कर. पहिल्यांदा प्रेग्नेंट होती तेव्हा जाहिरात करण्याची ही आयडिया कुठे होती. आता करीनाला कॉपी करुन तु करीना नाही बनू शकत.
- Moniishaabhagat01 नावाच्या एका यूजरने लिहिले - "मीरा पहिले तुझ्या चेह-याचा नॉर्मल फोटो टाक, नंतर 28 दिवस चॅलेंज घेऊन दोन्ही फोटो मॅच करत. मला नाही वाटत की, रिजल्ट काही वेगळा येईल. ही जाहिरात फेक आणि हॉरिबल आहे."

 

बातम्या आणखी आहेत...