आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वीकृत सदस्यांसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मनपा पाचपैकी शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, तर भाजपच्या वाट्याला 1 सदस्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर आता स्थायी समिती सदस्य, स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. सर्वच पक्षांत या जागांवर नियुक्ती मिळवण्यासाठी रस्सीखेच पहायला मिळत आहे. स्थायी समिती सदस्य, स्वीकृत सदस्य, तसेच महिला व बालकल्याण समितीत स्थान मिळवण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली आहे. स्वीकृत सदस्यत्व मिळवण्यासाठी मातब्बरांकडून प्रयत्न सुरू आहेत. 

 

महापालिकेच्या निवडणुकीत नगरकरांनी ६८ कारभाऱ्यांना निवडून दिले आहे. शहराचा सर्वांगीण विकासाच्या गप्पा अन् वल्गना निवडणुकीपूर्वीच्या जाहीर अन् गल्लीतील सभेत मतदारांनी ऐकल्या आहेत. आता नगरचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी या कारभाऱ्यांवर आहे. शिवसेनेला सर्वाधिक २४, राष्ट्रवादी १८, भाजप १४, काँग्रेस ५, बहुजन समाज पक्ष ४, समाजवादी पक्ष १, तर २ अपक्ष निवडून आले आहेत. त्यानंतर झालेल्या सभेत महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे, तर उपमहापौरपदी मालन ढोणे यांची निवड झाली. आता स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच स्वीकृत सदस्यांच्या निवडीकडे लक्ष लागले आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला असल्याने कोणतेही पद राष्ट्रवादी घेण्यास तयार नाही. त्यामुळे भाजपला पाठिंबा देणारा बहुजन समाज पक्ष स्थायी समितीकडे लक्ष ठेवून आहे. मनपाची अार्थिक नाडी असलेल्या स्थानी समितीच्या सभापतिपदी बसपच्या उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता आहे. या समितीत १६ सदस्य नियुक्त करायचे आहेत.

त्यानुसार शिवसेनेचे सर्वाधिक ६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५, भाजप ३, काँग्रेस १ तर बसपच्या एका सदस्याला या समितीत स्थान मिळणार आहे. या समितीत स्थान मिळवण्यासाठी निवडून आलेल्या नगरसेवकांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या सदस्यांमधूनच सभापतिपद निवडले जाणार आहे. भाजपला बाहेरून पाठिंबा दिल्यामुळे पक्षाकडून नोटिसा बजावण्यात अाल्या होत्या. त्यामुळे आता स्थायीचे सभापती निवडताना राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला मदत करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

 

मनपात ५ स्वीकृत सदस्य नियुक्त करायचे आहेत. पक्षाचा गटनेता या सदस्यांची नावे महापौरांकडे देणार आहे. स्वीकृत सदस्यांच्या स्पर्धेत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच पहायला मिळत आहे. स्वीकत सदस्यत्व पदरात पाडून घेण्यासाठी स्थानिक नेत्यांकडे फिल्डिंगही लावण्यात आली आहे. मनपाच्या एकूण जागा भागीले नियुक्त करायच्या स्वीकृत सदस्यांची संख्या या गणिताचे उत्तर एका सदस्याचे मूल्य ठरवते. त्यानंतर पक्षाचे निवडून आलेले सदस्य भागिले सदस्याचे मूल्य हे गणित सोडवल्यास पक्ष किंवा गटनिहाय स्वीकृत सदस्यांचा कोटा ठरवला जातो. त्यानुसार शिवसेना २, राष्ट्रवादी २ व भाजपच्या एका जणाला स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे. 

 

'स्वीकृत'साठी इच्छुक उमेदवार 
महापालिकेत स्वीकृत सदस्यांची संख्या ५ आहे. यापैकी शिवसेनेच्या वाट्याला दोन सदस्य येणार आहेत. त्यासाठी भगवान फुलसौंदर, अक्षय कातोरे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, विशाल वालकर, हर्षवर्धन कोतकर यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेल्या २ जागांसाठी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, नीलेश बांगरे, सुरेश बनसोडे, दत्ता खैरे, संजय घुले, आरिफ शेख आदी इच्छुक आहेत. भाजपला स्वीकृत सदस्यांमध्ये एक जागा मिळणार आहे. त्यासाठी सुवेंद्र गांधी यांचे नाव चर्चेत आहे.

 

विरोधी पक्षनेता कोण ? 
महापालिका अिधनियम १९ एक -अ अ (१) नुसार मोठे संख्याबळ असलेल्या विरोधी पक्षाचा नेता असेल तो विरोधी पक्षनेता असेल. त्यानुसार सर्वाधिक संख्याबळ शिवसेनेकडे असल्याने त्यांच्याकडे विरोधी पक्षनेता पद जाण्याची शक्यता आहे. या पदासाठी गटनेेत्या रोहिणी शेंडगे यांचे नाव चर्चेत असले, तरी बाळासाहेब बोराटे यांचेही नाव कार्यकर्त्यांकडून पुढे केले जात आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या नगरसेविका सािरका भुतकर यांनाही या पदावर बसवण्यासाठी इतर पक्षाकडून प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.