आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकांसाठी शिवसेनाही अवलंबणार 'भाजप पॅटर्न'! भाजपच्या 'वन बूथ ट्वेंटी यूथ'सारखे धोरण राबवून पक्षबांधणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एकामागोमाग एक निवडणुका जिंकण्याचा सपाटा लावलेेल्या भाजपप्रमाणेच रणनीती अाखण्याची तयारी शिवसेनेेने चालवली अाहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तसे संकेत दिले. एकीकडे युतीचे संकेत देत असताना दुसरीकडे स्वबळावर निवडणुका लढवण्यास सज्ज राहण्याचे अादेशही त्यांनी बैठकीस उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले. भाजपने देशभर 'वन बूथ ट्वेंटी यूथ' धोरण राबवून संघटनात्मक बांधणी व प्रचार यंत्रणा मजबूत केली हाेती. त्याचा त्यांना चांगलाच फायदा झाला. त्यामुळे हाच पॅटर्न राबवून भाजपशी दाेन हात करण्याचा मनाेदय ठाकरेंनी व्यक्त केला. तसेच त्वरित कामाला लागण्याचे अादेशही पदाधिकाऱ्यांना दिले. 

 

बूथ-पन्ना प्रमुख नेमणार : बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख नेमण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यासाठी चांगले कार्यकर्ते त्वरित निवडावेत व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पक्ष कसा पोहोचेल ते पाहावे, असे अादेशही उद्धव ठाकरे यांनी दिले. 


दुष्काळ : राज्यात भीषण दुष्काळ आहे. सरकारमध्ये असलो तरी शिवसेना स्वतंत्र मदत योजना अाखेल. पक्षनेत्यांनी दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून तेथे नेमकी कशी मदत हवी, याचा अहवाल देण्याचे अादेश ठाकरेंनी दिले. 
राममंदिर : राममंदिर बांधण्यासाठी कोर्टाकडे बोट दाखवून चालणार नाही, तर केंद्राला तसा कायदा करावा लागेल. वर्षानुवर्षे झाेपलेल्या 'कुंभकर्णा'ला उठवण्यासाठी मी अयोध्येत गेलो, अाता राज्यातही दाैरे करेन, असे ठाकरे म्हणाले. 

 

बातम्या आणखी आहेत...