आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीराम रथाेत्सवास 146 वर्षांची परंपरा; यंदा पावसाच्या हजेरीने भाविकांचा उत्साह शिगेला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव -  जळगावचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिक प्रबोधिनी एकादशीनिमित्त रथाेत्सव काढण्यात अाला. या उत्सवाला १४६ वर्षांची परंपरा अाहे.  साेमवारी सकाळी ११ वाजेला श्रीरामांच्या रथाची विधिवत पूजा सुरू करण्यात आली. या वेळी नगारे, झांज, सनई, चौघडे व ढोल-ताशांच्या गजराने वातावरण भारावून गेले. रथावर लाकडी घोडे, सारथी म्हणून अर्जुन, गरुड, मारुतीची लाकडी मूर्ती, तसेच अप्पा महाराजांना मिळालेली प्रासादिक प्रभू श्रीरामांची उत्सवमूर्ती सजवून स्थापित करण्यात आली. त्यानंतर दुपारी १ वाजून २० मिनिटांनी रथाेत्सवाला जयघाेषात प्रारंभ झाला. दर्शनासाठी भाविकांची अलाेट गर्दी झाली हाेती. दुपारी ४ वाजता पावसाला सुरुवात झाल्याने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले हाेते.

 

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे १० फुटांचा श्रीरामांचा पुतळा ट्रॅक्टरवर उभारला होता. तर यंदा प्रथमच मोठ्या रथाच्या पुढे चिमुकल्या रामभक्तांचे सहा रथ मिरवणूक मार्गात शोभा वाढवत होते.    

 

- २३० मण साग व तिवसाच्या लाकडापासून यावलचे त्र्यंबक नारायण मिस्त्री यांच्या कलाकुसरीतून दाेन वर्षांत हा रथ साकारला हाेता.   
- २५ फूट रथाची उंची अाहे. रथाचे लाकूड चकाकते राहावे म्हणून त्याला बेलाच्या तेलाचे लेपन लावले जायचे. मात्र, माती, धुळीचा थर बसून नक्षीकाम बुजले गेले हाेते. त्यानंतर पुन्हा चकाकीसाठी प्रयत्न करण्यात अाले.  
- १६ फूट लांब पुष्पहार  जुन्या जळगावातील श्रीराम फूल भांडारचे संचालक समाधान बारी यांच्याकडून गेल्या १२ वर्षांपासून रथाला अर्पण केला जाताे.   

- १८७२ या वर्षी या रथाेत्सवाला अप्पा महाराज यांनी सुरुवात केली. ७६ वर्षे हा रथ श्रीराम मंदिरापासून निघून जुने जळगाव, भवानी माता मंदिराकडून लालशा बाबा दर्गासमाेरून पुन्हा श्रीराम मंदिराजवळ असा पाेहाेचायचा. हे अंतर ४ किमी हाेते. नंतर  ७० वर्षांपूर्वी रथाेत्सव मार्गाचा विस्तार साडेसात किमीपर्यंत करण्यात अाला.  

- २००२ मध्ये साेने वितळण्यासाठी वापरण्यात येणारी सामग्री वापरून रथावरील धुळीचे थर काढण्यात अाले. त्यासाठी २० दिवस लागले हाेते. त्यानंतर रथाला बेलतेलाएेवजी वाॅर्निश लावण्यात येत अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...