आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेहराबुद्दीन :कटाच्या सूत्रधारांत अमित शहा, मुख्य तपासाधिकाऱ्याचा न्यायालयात दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीच्या कटाच्या मुख्य सूत्रधारांमध्ये भाजपाध्यक्ष अमित शहा, डी.जी. वंजारांसह ३ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा दावा मुख्य तपास अधिकारी संदीप तामगडे यांनी बुधवारी विशेष सीबीआय कोर्टात केला आहे. 


तामगडेंनी कोर्टात सांगितले की, सोहराबुद्दीन व तुलसी प्रजापती बनावट चकमक हा राजकारणी आणि गुन्हेगारांच्या संगनमताचा परिणाम होता. अमित शहा, आयपीएस डी.जी. वंजारी, राजकुमार पांडियन, दिनेश एम.एन. हत्याकांडाचे मुख्य कारस्थानी होते. तपासातील पुराव्यांअाधारेच या सर्वांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. 


बचाव पक्षाच्या वकिलांच्या प्रश्नावर तामगडे म्हणाले, त्यांनी राजस्थानचे तत्कालीन गृहमंत्री गुलाबचंद कटारिया, मार्बल व्यापारी, विमल पाटणी आणि हैदराबादचे आयपीएस सुब्रमण्यम आणि एसआय श्रीनिवास राव  याची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्रही सादर केले होते. मात्र याबाबत आपल्याकडे कोणताही कागदोपत्री पुरावा नाही.

बातम्या आणखी आहेत...