आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या. तीन राज्यातील निवडणुकांत विजय मिळाल्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव सत्ताधारी भाजपच्या सभागृह नेत्याला मांडवा लागला. तर पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावर प्रशासनावर आरोप करत बसपच्या चार नगरसेवकांनी राजीनामे महापौरांकडे सुपूर्त केेले. ते पुढे गेले नाहीत, महापौरांकडेच राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसने भूसंपादनाचा विषय पुरवणी अजेंड्यात आणल्याबद्दल भाजपला धारेवर धरले. तर शिवसेनेने सिद्धेश्वर यात्रेनिमित्त जनावर बाजार भरवण्याचा प्रस्ताव मांडत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. हे कमी होते की काय म्हणून इक्बाल मैदानाची जागा वकिलांना खेळासाठी देण्याच्या मुद्द्यावर एमआयएम आणि काँग्रेसने गोंधळ घातला.
महापालिकेची जानेवारी महिन्यातील सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. अजेंड्यावरील सर्व विषयावर निर्णय घेतले तरी राजकीय व प्रशासकीय कुरघोडी मात्र पाहण्यास मिळाली. विकासाच्या मुद्दा करत बसपच्या चार नगरसेवकांनी राजीनामा देण्याची भाषा करत सभात्याग करताना पालिका पाणीपुरवठा विभागावर आरोप केले. राजीनामा महापौरांकडे सुपूर्द करून नाट्य घडवले. कामासाठी प्रशासनावर दबावतंत्रांचा वापर केला. राजीनामा पत्र महापौरांपर्यंत सीमित राहिले.
महापालिका सभागृहात राष्ट्रवादीचे किसन जाधव यांनी आरक्षण जागेबाबत जागा मालकांनी दिलेल्या नोटीसीनुसार आयुक्तांनी अजेड्यावर भूसंपादनासाठी कोट्यवधीची मागणी सभागृहाकडे केली. या प्रस्तावावर राष्ट्रवादीचे पालिका गटनेते जाधव यांनी प्रशासनावर
आरोप केला. असे प्रस्ताव सभेच्या पुरवणी अजेंड्यावर कसे येतात? सात दिवस अगोदर का नाही? असे म्हणत प्रश्नावली टाकले. ठरवून प्रस्ताव दिला जात नाही. जागा मालकांनी नोटीस दिल्यावर ते कायद्याने घ्यावे लागते आणि तसा प्रस्ताव अजेंड्यावर घ्यावा लागतो. यात हितसंबंध नसते, असे म्हणत प्रशासनावर केलेल्या आरोपांचे खंडत करत नाराजी व्यक्त केली.
इक्बाल मैदानची जागा वकिलांना खेळांसाठी देण्याबाबत प्रस्ताव होता. त्यास विरोध करत एमआयएम व काँग्रेसचे नगरसेवक एकवटले असले तरी भाजप व शिवसेनेने प्रस्तावावर ठाम राहत एकमताने प्रस्ताव मंजूर केला. पण आयुक्तांवर निर्णय सोपवला. चेतन नरोटे यांनी जागेचा मालक कोण, असा प्रश्न उपस्थित करत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. प्रस्ताव मान्य होताच नगरसेवक महापौरांच्या आसनासमोरील हौद्यात एकवटले. नेहमी शिवसेनेस सोबत घेत सभा यशस्वी करणारे सभागृह नेते संजय कोळी यांना मात्र शुक्रवारी सभागृहात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे अभिनंदन करावे लागले. काँग्रेसच्या चेतन नरोटे यांनी तसा प्रस्ताव दिला होता. त्याचे वाचन करताना गांधींचे अभिनंदन केले.
पुराव्यांसह आरोप करा
जागेचे प्रस्ताव देत असताना कोणाचे हित पाहिले जात नाही. त्यांनी नोटीस दिल्यावर ते घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार आम्ही भूसंपादनासाठी रक्कम मागत प्रस्ताव दिला. वैयक्तिक हित ठेवून प्रस्ताव दिले नाही. असे असेल तर पुरावा द्यावा. आरोप करण्यात आले त्यांचा निषेध. इक्बाल मैदानची जागा शासनाची असताना मनपास ठराव करता येत नाही. डाॅ. अविनाश ढाकणे, मनपा आयुक्त
निषेध करण्यापेक्षा उत्तर द्यावे
आम्ही नगरसेवक म्हणून सभागृहात प्रशासनास विचारत असतो, त्यांचे उत्तर आयुक्तांनी द्यावे. निषेध करू नये. यापूर्वी पुराव्यासह माहिती दिली होती. पण त्यावर काहीच कारवाई झाली नाही. आम्ही सभागृहात राष्ट्रवादीची भूमिका मांडली. आयुक्तांनी उत्तर देण्यापेक्षा निषेध केले. त्यांचे वाईट वाटले. किसन जाधव, गटनेते राष्ट्रवादी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.