आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
महापौर बनशेट्टी यांनी समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे गुरुवारी सायंकाळी आयुक्तांशी चर्चा करताना स्पष्ट केले पण तो प्रस्ताव शनिवारी जाणार आहे. एकीकडे जलवाहिनीच्या प्रस्तावास मान्यता मिळाली असताना महापालिका सभागृहाच्या अजेंड्यावर न आलेले सुमारे ३२ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. महिन्याच्या आत प्रलंबित प्रस्ताव अजेंड्यावर घेतले जातील, अशी माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली.
एकीकडे दुहेरी जलवाहिनीचे प्रस्ताव मंजुरीअंती प्रशासनाकडे जाणार असले तरी अजंेंड्यावर न घेतलेले ३२ प्रस्ताव आहेत. त्यात पार्क चौपाटीवरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांना जागा देणे, त्यांच्याकडून २.९५ ऐवजी ३५.९८ लाख भाडे घेणे, प्रभाग क्रमांक १३ येथे वाडीकर घरापासून ते संतोष आलदी घरापर्यंत, सतनाम चौक, राजीव नगर, प्रभाग क्रमांक ११ येथील तुळजाई भोसले नगर, संतोष नगर बाळे, आकाशवाणी केंद्र, शेळगी महादेव मंदिर, सेंटममेंट फ्री काॅलनी सहा येथील चव्हाणवस्ती परिसरात पाइपलाइन घालणे, ८ वैद्यकीय अधीक्षकांना मुदतवाढ देणे, प्रभाग क्रमांक पाच येथील मंगल चुना भांडार येथे ड्रेनेज लाइन घालणे, शेळगी नाल्यावरील वसंत विहार रस्ता येथे पूल बांधणे, मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र, मुंबईहून सोलापूर महापालिकेत बदली करणे, रोप खरेदी, मशीन खरेदी करणे. हातपंपाचे साहित्य पुरवणे, पोलिस मुख्यालय परिसर, प्रभाग क्रमांक १७ येथील सरस्वती तालीम, सग्गम नगर, शेळगी गावठाण येथील मशीद शेजारी, बाळे येथील शिवाजी नगर, प्रभाग क्रमांक १३ येथील घोडके घर परिसरात ड्रेनेज लाइन घालणे. परिवहन विभागातील ३५ वाहनाचे स्क्रॅप विक्री, सात रस्ता व बुधवार पेठेतील परिवहनची जागा भाड्याने देणे. नेहरूनगर येथील शासकीय जलतरण तलाव मनपाकडून चालवण्यास घेणे, विंधन विहिरीवर पंप बसवणे आदी विषय आहे.
महापौरांच्या शंकेचे केले निरसन
समांतर जलवाहिनीसह अन्य मंजूर झालेले प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे प्राप्त झाले नाहीत. त्यात उजनी ते सोलापूर असे ४३९ कोटींचा समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव महत्त्वाचा आहे. याबाबत महापौर बनशेट्टी व आयुक्त डाॅ. ढाकणे यांच्यात गुरुवारी सायंकाळी महापालिकेत चर्चा झाली. महापौरांना असलेल्या शंकेचे निरसन आयुक्तांनी केले. त्यानंतर समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव पाठवण्याचे महापौरांनी मान्य केले. पण गुरुवारी रात्री उशिरापर्यंत आयुक्तांकडे प्रस्ताव आला नव्हता. शुक्रवारी सुटी असल्याने शनिवारी मंजूर झालेले सर्व प्रस्ताव आयुक्तांकडे जातील, असे महापौर बनशेट्टी यांनी सांगितले.
प्रस्ताव पाठवू
दुहेरी जलवाहिनीचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवणार आहे. पाण्याचा प्रश्न शहरासाठी महत्त्वाचे आहे. पुढील काळात अडचण येऊ नये म्हणून आयुक्तांशी चर्चा केली. प्रलंबित प्रस्ताव महिन्याच्या आत अजेंड्यावर घेऊन चर्चा करून मान्यता देऊ.
- शोभा बनशेट्टी, महापौर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.