आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - शहरात पाऊस पडतोय. त्यामुळे रस्त्यावरील पाण्यात लपलेले खड्डे वाहनधारकांना ठळकपणे जाणवू लागले आहेत. कुंभारवेेस, कोंतम चौक, साखर पेठ, भारतीय चौक, बाळीवेससह शहरातील १२०० किमी रस्त्यांपैकी ६०० किमी रस्ते खराब आहेत. हद्दवाढ भागात खड्डे आणि दलदल निर्माण झाली आहे. महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने अध्यादेश जारी करून १३ कलमी कार्यक्रम महापालिकेला दिला आहे. त्याने तरी सोलापूर खड्डेमुक्त हाेणार का, की गणरायाचे स्वागत खड्ड्यांनीच होणार असा प्रश्न पडला आहे. जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर या अगोदर दोन ते तीन वेळा पाण्याच्या पाइपचे काम करण्यात आले आहे. त्या ठिकाणी सपाटीकरण केल्यानंतर लगेच पाणी लिकेज सुरू झाले आहे.
महापालिका म्हणते दुरुस्तीचे काम सुरू
शनिवारपासून खड्डे दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मिरवणूक मार्गावरील खड्डे दुरुस्त करण्यात येतील. त्यानंतर इतर भागातील रस्ते दुरुस्त करण्यात येणार आहे. हद्दवाढ भागात मुरूम घालण्यासाठी मान्यता दिली आहे. प्रत्येक झोनला रस्ते दुरुस्तीसाठी पाच लाखांची तरतूद केली असून, त्यानुसार झोन अधिकाऱ्यांना आदेश दिले.
- संदीप कारंजे, प्रभारी नगरअभियंता, मनपा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.