आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीची गती मंद, शासनाचा १९० कोटींचा निधी खर्च होता होईना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहराला विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मागील आठ वर्षात १०९७ कोटी रुपयांचा निधी मिळाला. याशिवाय स्मार्ट सिटीच्या ३४६ कोटी निधीचा समावेश आहे. यापैकी महापालिकेने ९९९ कोटी रुपये खर्च केले तर १९०.७४ कोटी निधी अद्याप शिल्लक आहे. तर दुसरीकडे भांडवली कामासाठी तरतूद करण्यात आलेल्या २०९ कोटींचा निधी महापालिकेच्या आर्थिक स्थितीअभावी मिळेना. त्यामुळे शहर विकास संथगतीने हाेताना दिसून येत आहे. 

१०० कोटींचा निधी महापालिकेकडे पडून आहे तर हद्दवाढसाठी असलेल्या १७ कोटी निधीचा वाद भाजप व शिवसेनेत पेटला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून ३६ प्रकारचे विकास निधी देण्यात येतात. त्यात एलबीटीचे अनुदान पूर्णपणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनासह इतर बाबींवर खर्च केला आहे. याशिवाय महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, डाॅ. आंबेडकर श्रमसाफल्य योजना, घर तेथे शौचालय, राजीव आवास योजना, पथदिव्याचे पथदर्शी प्रकल्प, जमीन महसूल, करमणूक कर, मत्स्य बाजार, महसूल, जेएनयूआरएम बस खरेदी अनुदान पूर्णपणे खर्च झाले आहेत. 

 

नगरसेवकांना फक्त ६ लाखांची कामे 
महापालिका अंदाजपत्रक सादर करताना नगरसेवकांसाठी निधीची तरतूद केली जाते. त्यानुसार सन २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात २०९ कोटींची कामे सुचवली. यात आयुक्तांनी १३९ कोटींची कामे सुचवली तर सभागृहाने वार्ड वाईज मधून प्रत्येक नगरसेवकांना ६.४२ लाखांची कामे वगळता ७१ कोटींची कामे सुचवली. यापैकी ६ लाख वगळता अन्य कोणताही निधी यंदा वितरीत केला नाही. डिसेंबर महिन्यात सुधारित बजेट तयार केले जाते. आॅक्टोबर महिना उलटत आला तरी नगरसेवकांना निधी मिळेना, अशी अवस्था आहे. 

 

मागील वर्षाची भांडवली कामे प्रलंबित 
सन २०१७-१८ च्या महापालिका बजेटमध्ये २७८ कोटींची कामे सुचवण्यात आली होती. त्यापैकी १० टक्के कामे झाली नाहीत. महापालिकेने कामास अभिप्राय दिला. तो देताना महापालिकेची आर्थिक परिस्थिती नमूद केली. त्यामुळे मक्तेदारांनी कामे घेतली नाहीत. ३० कोटींची कामे झाली नाहीत. मागील वर्षाची कामे झाली नाहीत. ती पूर्ण केल्यानंतर चालू वर्षातील कामे सुरुवात करण्यात येणार असल्याचे आयुक्त म्हणाले. 

 

बातम्या आणखी आहेत...