आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहगड अभियांत्रिकीत आजपासून विद्यार्थ्यांच्या कलेचा होणार जागर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाच्या १५ व्या युवा महोत्सवास उद्या शनिवारपासून सिंहगड अभियांत्रिकीमध्ये मोठ्या जल्लोषात प्रारंभ होत आहे. ५१ महाविद्यालयातील एकूण १३३८ विद्यार्थ्यांचा २८ कलाप्रकारांतून सहभाग राहील. यात ८०७ युवक तर ५३१ युवतींचा समावेश आहे. एक पाऊल स्त्री सन्मानासाठी हे महोत्सवातील मुख्य संदेश तसेच मध्यवर्ती संकल्पनाही असेल, असे यजमान सिंहगड महाविद्यालयाचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी सांगितले. 


महोत्सवात महापौर शोभा बनशेट्टी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. अध्यक्षस्थानी डॉ. मृणालिनी फडणवीस असतील. उद््घाटक म्हणून प्रो. एम. एन. नवले यांची प्रमुख उपस्थिती राहील. 

 

सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या उद््घाटनानंतर दुपारच्या सत्रापासून विविध स्पर्धांना प्रारंभ होईल. पहिल्या दिवशी असेल मूकनाट्य, समूहगीत, कातरकाम, वक्तृत्व, प्रश्नमंजूषा लेखी, भित्तीचित्रण, एकांिकका आणि रांगोळी या कलाप्रकारांचे सादरीकरण. 

 

चार दिवस असणार धमाल 

जिल्ह्यातील ५१ महाविद्यालयांतून ८०७ युवक तर ५३१ युवतींचा असेल सहभाग 
सिंहगड अभियांत्रिकी येथे युवा महोत्सवाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली. असा भव्य शामियाना उभा केला आहे. 

 

आज युवा महोत्सवात या कलाप्रकारांचे सादरीकरण 
-  सकाळी ९.०० - नोंदणी 
- सकाळी १०.३० - उद््घाटन 
- दुपारी १२.३० - संघ व्यवस्थापक बैठक 
- दुपारी १.०० - मूकनाट्य - काशीबाई नवले मुख्य रंगमंच 
- दुपारी १.०० - समूहगीत - लता मंगेशकर रंगमंच 
- दुपारी १.०० - कातरकाम - बहिणाबाई चौधरी रंगमंच 
- दुपारी १.०० - वक्तृत्व - सावित्रीबाई फुले सभागृह 
- दुपारी १.०० - प्रश्नमंजूषा लेखी - कल्पना चावला सभागृह 
- दुपारी ४.०० - भित्तीचित्रण - बहिणाबाई चौधरी रंगमंच 
- सायंकाळी ६.०० - एकांकिका - काशीबाई नवले मुख्य रंगमंच 
 - सायंकाळी ७.०० - रांगोळी - बहिणाबाई चौधरी रंगमंच 
- सोलापूर विद्यापीठाच्या १५ व्या युवा महोत्सवाची तयारी पूर्णत्वास आली. मुख्य रंगमंचासह सर्व सभागृह, कक्ष तसेच बैठक व्यवस्था पूर्णपणे सज्ज झाली आहे. 

 

लॉटस तयार 
सहभागी महाविद्यालयांचे लॉटस तयार करण्यात आले असून त्याबाबत महाविद्यालयांना युवा महोत्सव प्रांगणात सविस्तर सूचना मिळतील. लॉटस नुसारच स्पर्धा घेण्यात येतील. सादरीकरण व सहभागाचे नियोजन लॉटसनुसारच काटेकोर राबवण्यात येतील. दिलेल्या वेळेतच सादरीकरण करण्याची सूचना संघ व्यवस्थापकांना देण्यात आली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...