आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण देशात महाअाघाडी हाेणे अशक्य, माेदींच्या ‘नामदार विरुद्ध कामदार’चे उत्तर देऊ शकतात मायावती : राजदीप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या मते, ‘२०१९ च्या निवडणुकीत विराेधी पक्षांची देशभर महाअाघाडी हाेणे शक्य नाही. काही राज्यांत अाघाडी हाेईल. माेदींच्या ‘नामदार विरुद्ध कामदार’चे उत्तर मायावती देऊ शकतात.’ ‘भास्कर’चे अनिरुद्ध शर्मा यांनी घेतलेल्या मुलाखतीचा सारांश...

 

प्रश्न - माेदींना हरवणे अशक्य अाहे का?

उत्तर : लाेकप्रियतेत अाज माेदी नंबर वन अाहेत. त्यांना पराभूत करणे अवघड असले तरी अशक्य नाही. महाअाघाडीने असेल तर चुरशीची लढत हाेऊ शकते. मात्र देशभरात सर्व विराेधकांची एकजूट हाेईल, असे वाटत नाही, काही राज्यांत अाघाडी हाेईल. ‘टीअारएस’ने महाअाघाडीत जाणार नसल्याचे स्पष्ट केले अाहे. छत्तीसगडमध्ये मायावती व अजित जाेगींची युती झाली. बंगालमध्ये ममता बॅनर्जी व डावे एकत्र येण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढेल की काॅंग्रेस- राष्ट्रवादीसाेबत जाईल हेही अनुत्तरीत अाहे. यूपीत मायावती, अखिलेश, अजित सिंह व काॅंग्रेस एकत्र अाले तर भाजपला माेठे अाव्हान मिळू शकेल.


प्रश्न - बिना चेहऱ्याचे विराेधक माेदींचा सामना करू शकतील?
उत्तर : अाजच्या माध्यम युगात चेहऱ्यांबाबत काही प्रमाणात अाकर्षण अाहे, विशेषत: तरुणाईत. ते मुद्द्यांकडे लक्ष देत नाहीत तर चेहऱ्याकडे पाहतात. राजकारणातही अाता स्टार कल्चर अाले अाहे.  एकीकडे माेदी अाहे तर दुसरीकडे काेण? हा एक सापळा अाहे. विराेधकांनी काेणतेही नाव पुढे केले तरी माेदींना निवडणूक जिंकले साेपे हाेईल. विराेधकांना असे करायचे नसेल तर एक टीम बनवावी लागेल. सांगावे लागेल की अामच्याकडे हे १० ‘चेहरे’ अाहेत.

 

प्रश्न - विराेधकांकडे सक्षम काेण?
उत्तर : काॅंग्रेस राहुल यांना पुढे करतेय. जेव्हापासून ते रफालसारखे मुद्दे उपस्थित करत अाहेत तेव्हापासून त्यांना पहिल्या पानावर जागा मिळत अाहे. एकप्रकारे ते विराेधकांचा चेहरा बनले अाहेत. मी विराेधी पक्षात असताे तर मायावतींना निदान ‘यूपीए’ची अध्यक्षा बनवा, असे सुचवले असते. ‘नामदार विरुद्ध कामदार’ ही जी अटकळ माेदींनी बांधली अाहे त्यात राहुल फसू शकतात. मायावतीसमाेर मात्र माेदींची ही ‘मात्रा’ लागू हाेत नाही. दलितांचा अाक्राेश समाेर अाणायचा असेल तर मायावती यांना ‘यूपीए’ची अध्यक्षा बनवा, प्रचार प्रमुख बनवा. एखाद्या नेत्यात राष्ट्रीय पातळीवर मते मिळवण्याची क्षमता असेल तर त्या मायावती अाहेत. यातून चांगला संदेश जाईल. अाजपर्यंत एकाही दलिताने तेही महिला, पंतप्रधानपदासाठी निवडणूक लढवलेली नाही.


प्रश्न - यूपीत सपा- बसपाची अाघाडी झाल्यास भाजपला यश मिळेल का?
उत्तर : या निवडणुकीतील सर्वात माेठा एक्स फॅक्टर अाहे उत्तर प्रदेश. मायावती व अखिलेश यांना अापल्या प्रतिस्पर्ध्यांशीच अाघाडी करावी लागेल. एकमेकाविराेधात लढले तर दाेघांच्याही १० जागा घटतील. अाघाडी झाली तर भाजपच्या ३५ जागा अाल्या तरी खूप झाले.

 

प्रश्न - देशात भाजप जागा गमावत अाहे, त्याची भरपाई कुठून करेल?

उत्तर : पश्चिम व उत्तरेकडील राज्यात भाजपला ७०- ७५ जागांचे नुकसान हाेत अाहे अाणि पूर्वेकडे २० जागा मिळू शकतील. म्हणजे ५० जागांचे नुकसान. ही भरपाई बंगाल, इशान्य, अाेडिशातून ते काही प्रमाणात करू शकतील. तामिळनाडूत रजनीकांतसाेबतही हातमिळवणी हाेऊ शकेल. मात्र केरळ, तेलंगणा, अांध्र प्रदेशात भाजप काही करू शकले असे वाटत नाही.
 

प्रश्न - २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडे काय मुद्दे आहेत ?
उत्तर : मोदींनी माेठी आश्वासने दिली होती. दरवर्षी १ कोटी नोकऱ्या देऊ, १५ लाख रुपये बँक खात्यावर जमा करू, काळा पैसा परत आणू इत्यादी. मग पेट्रोल किती महागले? हे दिसतेच. रुपया मनमोहनसिंग यांच्या वयासारखा वाढतोय. आता हाल पाहा. मोदी यासाठी जबाबदार आहेत. आश्वासने दिली खरी. परंतु त्याची अंमलबजावणी कितपत झाली हा प्रश्न आहे. विरोधक एक नकारात्मक, अँटी इन्कम्बसीचा मुद्दा घेऊन निवडणूक रिंगणात उतरेल. 

 

प्रश्न- मोदींच्या काळात सांप्रदायिकता, कट्टरवाद वाढल्याचा विरोधकांचा आरोप आहे. तुम्हाला काय वाटते ?
उत्तर : सांप्रदायिकता पूर्वी नव्हती, असे मुळीच नाही. काही गोष्टी संघ परिवाराशी जोडलेले आहेत. आता आमची वेळ आली आहे, असे त्यांना वाटते. भाषेचा वापर ज्या पद्धतीने केला जात आहे किंवा हिंसाचाराचे राजकारण केले जात आहे. बीफसारखे मुद्दे मांडले जात आहेत. त्यात एक जातीय मुद्दा आहे. हीच असहिष्णुता आहे. एखाद्या समुदायाला बाजूला कसे करता येईल? यावर २०१४ नंतर भर दिला गेला. सरकार पुन्हा आले तर या गोष्टींवर ते नियंत्रण कसे मिळवतील, याचीच भीती वाटते. मुस्लिम समुदायाला राजकीयदृष्ट्या दुर्लक्षिले जात आहे, असे वाटते. त्याचा देशावर परिणाम होऊ शकतो. 


प्रश्न- नोटबंदी व जीएसटीकडे तुम्ही कसे पाहता ?  
उत्तर : जीएसटी घाईत लागू केला. पहिल्या सहा महिन्यांत खूप त्रास झाला. पण आता सरकार यात यशस्वी असल्याचा दावा करू शकते. जीएसटीमधून उत्पन्न वाढले हा त्याचा पुरावा आहे. नोटबंदी डिझास्टर होते. काळा पैसा येणार, असे आधी म्हणाले. नंतर दहशतवाद थांबेल म्हणाले. नकली नोटा संपतील, अर्थव्यवस्था कॅशलेस होईल, असे सांगत होते. आता म्हणतायेत-टॅक्स बेस वाढला. म्हणूनच तुम्ही गोलपोस्ट वारंवार बदलले. हे स्पष्ट आहे. मग आजपर्यंत तुम्ही नोटबंदीवर श्वेतपत्रिका जारी का केली नाही ?, असे मला विचारायचे आहे. 

 

प्रश्न- मोदी सरकारचे मोठे यश व दोन अयशस्वी गोष्टी कोणत्या सांगाल ?
उत्तर :एक- डिजिटल ट्रान्झॅक्शनमधील लिकेजला थांबवण्याचा प्रयत्न. थेट हस्तांतरण लोकांना दिले. आता अनुदान लक्ष्यगटास मिळू लागले आहे. दुसरे- आक्रमक नेतृत्व दिले आहे. सरकारमध्ये एक ऊर्जा आहे. आश्वासने खूप दिली. ही सरकारची कमकुवत बाजू आहे. अपेक्षा खूप वाढवल्या. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, स्किल इंडिया योजना सुरू केल्या. परंतु सामान्य माणसाला काय फायदा झाला? टीम बनवू शकले नाहीत. कॅबिनेट एक टीम असते. नोटबंदीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सारख्या संस्थांना दुर्लक्षित करून स्वत: निर्णय घेतला. म्हणूनच नेतृत्वगुण ही ताकद आहे.तोच त्यांना दुबळे बनवतो.  

 

प्रश्न - सर्वच राजकीय पक्ष शेतकऱ्यांचा व्होट बँकेसारखा वापर करतायेत का ?
उत्तर : आधी किमान हमी भाव दिला नाही. आता तेच आमिष देत आहेत. निवडणूक आली की शेतकरी आठवतात.कृषी फेररचना का केली जात नाही ? 

 

प्रश्न- पत्रकार टीव्हीवर निवाडा करतात अशी धारणा आहे. तुम्हाला काय वाटते ? 
उत्तर : हे घडतेय. ही दु:खाची गोष्ट आहे. बातमी तर मिळतेच. तुम्ही तुमचे विचारही मांडा, असे सांगितले जाऊ लागले आहे. ३० वर्षांपूर्वी केवळ संपादकीयवर विचार मांडण्यास सांगितले जात. आता बातमी नको. चर्चा हवी. टीव्हीवर हे घडू लागलेय. पूर्वी प्रवक्ते करत आता ते न्यूज अँकर करू लागलेत. पत्रकारिता भटकली आहे. टीव्हीवर तर नौटंकी असते.  

 

प्रश्न- आजकाल मीडिया वाटलेला आहे. मोदींचे समर्थक वा मोदीविरोधी ?
उत्तर : समाज वाटला गेलाय. हीच फाळणी आता न्यूजरूममध्येही दिसते. माझे वर्गमित्र व्हॉट्सअॅप ग्रुपवर मोदी किंवा राहुलवर विनोद करत असतात. मोदी अजूनही लोकप्रिय नेते, असा मथळा दिल्यास तुम्ही विकले गेला, असे लोक म्हणतील. मायावतींच्या नेतृत्वाखालील आघाडी मोदींना आव्हान देणार म्हटल्यावर लोक तुम्हाला मोदी विरोधक म्हणतील. समाज वाटला गेला. वाहिन्याही वाटल्या गेल्या. आम्ही तर समाजाचे प्रतिबिंब दाखवतो. ही समस्या केवळ पत्रकाराची नव्हे, समाजाची आहे. 

 

राजदीप सरदेसाई (कन्सल्टिंग एडिटर)
इंडिया टुडे टीव्ही

 

बातम्या आणखी आहेत...