आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनश्रीला १८ व्या वर्षी पंचाच्या भूमिकेची आवड; आंतररराष्ट्रीय सामना न खेळता जमुनाचे वर्चस्व, अॅथलेटिक्स सोडून सस्मिताची कबड्डीला पसंती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चपळ पकड अाणि चित्त्याच्या झेपची सर्वाेत्कृष्ट चढाईने महाराष्ट्रातील मराठमाेळ्या कबड्डीला अाता अांतरराष्ट्रीय स्तरावर अाेळख मिळाली. यामुळेच प्राे कबड्डी लीगला अल्पावधीमध्ये तुफान लाेकप्रियता लाभली. खेळाडूपाठाेपाठच याच लीगमध्ये महिलांची पंचाची भूमिका अधिकच लक्षवेधी ठरत अाहे. पुरुषांच्या बराेबरीने या लीगमध्ये सहाव्या सत्रासाठी तब्बल ९ महिला या पंचाची भूमिका यशस्वीपणे पार पाडताना दिसत अाहेत. यामध्ये अारती बारी व धनश्री जाेशी या दाेन महाराष्ट्रीयन पंचांचा समावेश अाहे. सस्मिता दास अाणि जमुना व्यंकटेश या सहाव्यांदा या लीगमध्ये पंचाच्या भूमिकेत अाहेत, तर पुण्याच्या धनश्री जाेशीने करिअरमध्ये प्रथमच या लीगसाठी पंच म्हणून यशस्वी पदार्पण केले. अल्पावधीत लाेकप्रिय ठरलेल्या लीगच्या सहाव्या सत्राला नुकतीच सुुरुवात झाली. 

 

धनश्री: दहा वर्षांच्या अखंड साधनेतून संधी; पदार्पणाने उंचावला अात्मविश्वास 
राज्य अाणि क्लबच्या स्पर्धा गाजवल्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी पंचाच्या भूमिकेची अावड निर्माण झाली अाणि खऱ्या अर्थाने कबड्डीचा वसा कायम ठेवण्यासाठी तिने ही भूमिका यशस्वीपणे पार पाडण्याचा निर्णय घेतला. यासाठी मेहनतीच्या बळावर दहा वर्षांच्या केलेल्या अखंड साधनेतून पुण्याच्या धनश्री जाेशीने अाता प्राे लीगच्या माध्यमातून अांतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून पदार्पण केले. जिद्द व अात्मविश्वासाच्या बळावर तिला हा पल्ला गाठता अाला. यासाठी माहेर-सासऱ्यांचेही पाठबळ महत्त्वाचे ठरले. 

 

दहा वर्षांपासून पंचाच्या भूमिकेमध्ये : पुण्याच्या धनश्रीने महाराष्ट्रातील स्पर्धा गाजवल्या. राज्यस्तरीय स्पर्धेतून अापली चमक दाखवताना तिने क्लबच्या कबड्डी स्पर्धेतही दबदबा निर्माण केला. मात्र, मैदानावर कबड्डीपटूपेक्षा पंचाच्या वेगळ्या भूमिकेची तिला भुरळ पडली. यातून तिने यामध्येच करिअर करण्याचा निर्धार केला. यासह तिने २००८ मध्ये पंचाची परीक्षा उत्तीर्ण केली व या नव्या करिअरला सुरुवात केली. अखिल भारतीय कबड्डी स्पर्धांपासून क्लबच्या अनेक स्पर्धांत ती भूमिका यशस्वीपणे बजावत अाहे. 


राज्याबाहेर प्रथमच पंच : धनश्रीने एक दशक महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी कबड्डी स्पर्धेत पंचाची भूमिका पार पडली. अाता लीगच्या माध्यमातून तिला प्रथमच महाराष्ट्राच्या बाहेर पंच म्हणून कार्य करण्याची संधी अाहे. ती अाता हरियाणासह कर्नाटक, काेलकात्यामध्ये ही भूमिका पार पाडणार अाहे. 

 

जमुना : पाेलिसाची नाेकरी नाकारली, छंद जाेपासला 
कर्नाटकच्या जमुना व्यंकटेशने प्रचंड मेहनतीच्या बळावर कबड्डीमध्ये अापला दबदबा निर्माण केला. तिचे हे वर्चस्व इतरांपेक्षा वेगळे अाणि प्रेरणादायीच अाहे. तिला करिअरमध्ये कधीही मैदानावर कबड्डी खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच यासाठी काेणत्याही राष्ट्रीय महिला संघातही तिची निवड झाली नाही. मात्र, असे असतानाही तिला अापल्यातील कबड्डीचा छंद कायम ठेवता अाला. यामध्येच तिने प्रगती साधली. यासाठी तिने बारकावे, नियमांचा सखाेल अभ्यास केला. याच्या बळावर तिला पंच परीक्षा उत्तीर्ण हाेता अाली. तिने २००२ मध्ये यामध्ये हे घवघवीत यश संपादन केले. यामुळे ती भारताची पहिली महिला अांतरराष्ट्रीय महिला पंच ठरली. यामुळे तिची प्राे कबड्डी लीगमध्ये पंचाच्या भूमिकेसाठी संधी मिळाली. ती मागील पाच सत्रांपासून यात पंचाची भूमिका बजावत अाहे. तिने २०१२ मध्ये अांतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पंचाची भूमिका यशस्वीपणे बजावली. 

 

सस्मिता : हायजंपर असताना लागली कबड्डीची गाेडी 
अाेडिशातील ४२ वर्षीय सस्मिता दास ही अव्वल धावपटू व खाे-खाेपटू हाेती. याच खेळात तिने घवघवीत यशही संपादन केले. मात्र, तिला कबड्डीची अावड निर्माण झाली. यातूनच तिने खाे-खाे अाणि अॅथलेटिक्स साेडून दिले अाणि कबड्डीला पहिली पसंती दिली. यातच तिने करिअर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने २०१२ मध्ये पंचाची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. यामुळे तिला पंचाच्या भूमिकेसाठीची अधिकृत अशी मान्यता मिळाली. याच्या अाधारे अाता ती राष्ट्रीय अाणि अांतरराष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेत पंचाच्या भूमिकेत असते. 

बातम्या आणखी आहेत...