आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड: साखर कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लक्ष्मीनगर वसाहतीत राहणाऱ्या शेतकी अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीला आली. या प्रकरणी बारड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.   


भाऊराव चव्हाण कारखान्यात मुख्य शेतकी अधिकारी पदावर कार्यरत असलेले दामोदर रामचंद्र मोरे (५४) मूळ रहिवासी जांब (ता. मुखेड) हे कुटुंबासह कारखाना वसाहतीत घरात राहत होते. ते शुक्रवारी आपल्या पत्नीस गावाकडे सोडून परत आले. शुक्रवारी रात्री ते एकटेच घरी होते. शनिवारी सकाळी नित्याप्रमाणे त्यांचा चालक घरी गेला असता दार बंद असल्यामुळे त्याने दाराची कडी वाजवली.  परंतु प्रतिसाद न मिळाल्याने त्याने अनेक वेळा फोन लावला. बेल जाऊनही फोन उचलत नसल्यामुळे चालकाने शेजारी व सुरक्षा रक्षकास ही माहिती दिली.त्यांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता मोरे यांनी छताच्या पंख्यास साडी बांधून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. ही माहिती बारड पोलिसांना देण्यात आल्यावर त्यांनी घटनास्थळी येऊन सोपस्कार पूर्ण केले व अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सपो उपनिरीक्षक सावंत हे करीत आहेत.

 

घरगुती कारणावरून आत्महत्या?    
दामोदर मोरे यांची आत्महत्या धक्कादायक आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. तथापि त्यांनी घरगुती कारणावरून आत्महत्या केली असावी असा संशय आहे. बाहेरील त्यांच्यावर कोणताही तणाव नव्हता असे कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...