आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुमीत वाघमारे हत्या प्रकरण: तीन महिन्यांपूर्वी रचला सुमीतच्या हत्येचा कट; संधी मिळताच हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- बहिणीला पळवून नेऊन तिच्यासोबत विवाह करणारा सुमीत वाघमारे दिसला की बालाजीचे पित्त खवळायचे. त्याच्याबद्दल मनात भयंकर राग होता. यातूनच ३ महिन्यांपूर्वी त्याने सुमीतला संपवण्याचा कट रचला. एक वेळ संपूर्ण तयारीही करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी नियोजन बिघडले. पण दुसऱ्या वेळी मात्र भररस्त्यातच गाठून भाग्यश्री समोरच त्याची हत्या करण्यात आली. 

 

सुमीतच्या दुचाकीला कट मारून अपघात घडवण्याचा प्रयत्न झाल्याचे भाग्यश्रीने या पूर्वीच सांगितले होते.   १९ डिसेंबर रोजी सुमीत हा महाविद्यालयात आल्याची माहिती बालाजीला मिळाली होती. तेव्हाच त्याने सुमीतला संपवण्याचा प्लॅन केला. बालाजीने त्याच्या दुचाकीला कार आडवी लावली अन्   सुमीतवर शस्त्राने वार करून त्यास ठार केले.  यानंतर दोघेही कारने पसार झाले.  मंगळवारी रेल्वे पोलिसांच्या मदतीने बालाजी आणि संकेतला बडनेरा रेल्वेस्थानकातून अटक केली. 

 

मैत्रीसाठी काहीही; अडकला संकेत वाघ 
संकेत हा बालाजीचा जवळचा मित्र. एकमेकांसाठी दोघे काहीही करायला तयार असत. त्यामुळे या हत्येसाठी बालाजीने संकेतची मदत घेतली. त्याचीच कार वापरण्यात आली. बालाजी सुमीतवर वार करत असताना भाग्यश्रीला संकेतने धरून ठेवले. मैत्रीसाठी चुकीच्या कामातही तो सहभागी झाला. 

 

आतापर्यंत २७ जणांची चौकशी  
> आतापर्यंत या प्रकरणात एकूण २७ जणांची चौकशी करण्यात आली आहे. कटात सहभागी चौघे अटकेत अाहेत. यामध्ये खुनाबरोबरच १२० (ब) हे कलम वाढवण्यात आले आहे. 
- जी श्रीधर, पोलिस अधीक्षक, बीड 

 

कृष्णासह कुटुंबही झाले होते पसार 
बालाजीने कृष्णाला हत्येची माहिती दिल्यानंतर गजानन, कृष्णा हे आपल्या कुटुंबासह फरार झाले. ते आधी औरंगाबाद आणि तिथून पुण्याला गेले. गजानन याला पुण्यात सोडून पुन्हा ते औरंगाबादेत आले. तोपर्यंत हा कट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. 

 

गजानन बीडमध्ये आला अन् गेला  
पुण्याला पळून गेलेला गजानन क्षीरसागर एकदा बीडमध्ये आला होता.  नातेवाइक आणि मित्रांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे त्याला समजले. आपलाही पोलिस शोध घेत आहेत याची खात्री होताच तो पुन्हा पुण्याला पळून गेला. तेथून तो औरंगाबादला आला असता त्यालाही ताब्यात घेण्यात आले.

 

सर्व शक्यता पडताळून तपास 
बालाजी आणि संकेत यांचा शोध घेताना सर्व शक्यता पडताळून तपास करण्यात येत होता. बुधवारी त्यांना काेर्टासमाेर हजर केले जाईल. - सुधीर खिरडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी

बातम्या आणखी आहेत...