आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून एका तरी तृतीयपंथीस उमेदवारी देणार : खा. सुप्रिया सुळे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- दिल्लीत सत्ताधारी पक्षाच्या फारसे मनात नसताना आणि तो पक्ष फारसा अनुकूल नसतानाही लोकशाहीच्या मंदिरात सरोगसी आणि तृतीयपंथी यासारखी बिले पारित करून घेतली. आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून एका तरी तृतीयपंथी उमेदवाराला तिकीट देण्यासाठी मी आग्रही भूमिका घेईन. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी बोलणार आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे.

 
रविवारी साहित्यिक - कलावंत संमेलनाच्या व्यासपीठावर सुळेंचे भाषण चर्चेचा विषय बनले. मराठी संस्कृती, भाषा, साहित्यव्यवहार, संस्कार व वाचनसंस्कृती याविषयी काही मुद्दे बोलून, स्वपक्षाचा राजकीय अजेंडाही सुळे यांनी या भाषणातून मांडला.  त्या म्हणाल्या, आम्ही संतांनी दिलेल्या एकत्वाच्या, समतेच्या विचारांवर वाढलो, पण अलीकडची पिढी व्हॉट्सअॅपवर वाढते आहे,‘ असे म्हणत घरचाच किस्सा सुप्रियाताईंनी कथन केला. ‘माझ्या मुलाने माझा उल्लेख करताना “सूप’ असा केला, तेव्हा मी त्याच्यावर उखडले. तर तो म्हणाला, तूच आऊटडेटेड आहेस..शिवाजी मंदिर, रवींद्र नाट्य मंदिर हे आमचे हॉटस्पॉट होते, अलीकडे मुले वाचतच नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...