आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लूची दहशत : घाटीत आयसीयू फुल्ल असल्याने उघडणार जिल्हा रुग्णालयाचे द्वार!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राज्यातील काही जिल्ह्यांत स्वाइन फ्लूचे थैमान सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर घाटीतील आयसीयू आधीच फुल्ल असून तेथे २० रुग्ण वेटिंगवर असल्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून घाटी प्रशासनाने चिकलठाण्यातील सामान्य जिल्हा रुग्णालयातील आयसीयू आणि डॉक्टरांची टीम सज्ज केली आहे. गुरुवारपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू उघडण्यात येणार आहे. 


राज्यात नाशिक व पुणे येथे स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या आहे.तसेच काही दिवसांपूर्वी पिशोर येथील रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह आली. घाटीत चार संशयित रुग्णांवर उपचार केल्याची माहिती आहे. मात्र याला प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही. घाटीतील आयसीयूत जागा नसल्याने बुधवारी घाटीतील डॉक्टरांनी चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. 


अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर म्हणाल्या की, दक्षता म्हणून आम्ही ही तयारी केली आहे. सध्या स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण घाटीत नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात आम्ही पाहणी करून स्वाइन फ्लूचे रुग्ण आलेच तर उपचारांची पूर्ण तयारी करून ठेवली आहे. व्हेंटिलेटरसह औषधांचा पुरवठाही सज्ज आहे. घाटीतील डॉक्टरांची टीमही उपचारांसाठी सज्ज आहे. 

बातम्या आणखी आहेत...