आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'ऑनलाइन टेक क्विझ मॅरेथाॅन\'मध्ये भाग घेऊन पारखा स्वत:चे \'तंत्र-ज्ञान\'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- टेकाथॉन-२०१९ ही एक 'ऑनलाइन टेक क्विझ मॅरेथाॅन' असून, या स्पर्धेची रचना विशेषत: शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी करण्यात आली आहे. ही स्पर्धा शहर, राज्य व राष्ट्रीय अशा तीन पातळींवर आयोजित केली जाणार आहे. इंटरसिटी क्विझ ३० व ३१ जानेवारीला होईल. तसेच आंतरराज्य स्पर्धा १ तेे ७ एप्रिल २०१९ पर्यंत, तर राष्ट्रीय स्पर्धा १५ जुलै ते ३१ जुलैदरम्यान होईल. शहर पातळीवरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांना अनुक्रमे ५०००, २,५०० व १,२५० जेम्स, राज्य पातळीवरील विजेत्यांना १०,०००, ५००० व २,५०० जेम्स आणि राष्ट्रीय पातळीवरील विजेत्यांना १,००,०००, ५०,००० व २५,००० जेम्स दिले जातील. विजेते हे जेम्स रिडीम करवून विजस्टोरमधून आपल्या आवडीचे गुडीज घेऊ शकतात. स्पर्धेत सहभागासाठी स्पर्धकांना खालील संकेतस्थळावर जाऊन नाेंदणी करावी लागेल. 

 

www.techathon.whizjuniors.com