आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेलंगणा: महिला हवालदाराने एका बेवारस चिमुरडीस दिले स्तनपान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये दोन महिन्यांच्या बेवारस मुलीस महिला हवालदाराने स्तनपान दिले. ही मुलगी उस्मानिया सामान्य रुग्णालयाबाहेर रस्त्यावर रडत पडलेली होती. तिच्याकडे मोहंमद उस्मान या नागरिकाचे लक्ष गेले. त्याने तिला अफजलगंज पोलिस ठाण्यात नेले. हवालदार के. प्रियंका बेगमपेट यांनी सांगितले, माझे पती एम. रवींद्र अफजलगंज पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. रविवारी त्यांनी मला बोलावून घेतले. मी पोलिस ठाण्यात गेले. तेव्हा ती मुलगी भुकेमुळे रडत असल्याचे जाणवले. मी तिला जवळ घेतले. तिला माझे दूध पाजले. त्यानंतर मुलगी रडायची थांबली. सोमवारी सकाळी तिच्या आईचा शोध लागला. त्यानंतर मुलगी तिच्या ताब्यात देण्यात आली. दरम्यान, हैदराबाद पोलिस आयुक्तांनी या पोलिस दांपत्याचे कौतुक करून त्यांचा सन्मान केला.

 

पोलिसांनी सांगितले, त्या मुलीची आई  कचरावेचक आहे. तिने दारूच्या नशेत मुलीला रस्त्यावर सोडले. ती घराचा रस्ताही विसरली होती.